Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

सोमवार, १२ ऑक्टोंबर जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

12/10/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

11/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या ‘जनसुरक्षा विधायक’ कायद्याला विरोध, प्रांताधिकार्‍यांना दिले निवेदन
महाराष्ट्र संवाद विशेष

नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या ‘जनसुरक्षा विधायक’ कायद्याला विरोध, प्रांताधिकार्‍यांना दिले निवेदन

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे हुकूमशाही आणि दडपशाही पद्धतीने हा कायदा लागू करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/05/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – प्रतिनिधी 

जनसुरक्षा विधायक कायद्याच्या विरोधात संगमनेरमधील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आज (गुरुवारी २९ मे २०२५) प्रांताधिकार्‍यांना निवेदन दिले. हा कायदा जनतेच्या सुरक्षेऐवजी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा असून, तो रद्द करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, जनसुरक्षा विधायक कायद्याचे नाव जरी जनतेच्या सुरक्षेचे असले तरी, प्रत्यक्षात या कायद्यात जनतेच्या सुरक्षेसाठी काय आहे हे त्यात स्पष्ट केलेले नाही. विशेषतः, ‘शहरी नक्षलवाद’ या संकल्पनेची व्याख्याच या विधेयकात स्पष्ट करण्यात आलेली नाही. माओवाद आणि नक्षलवाद यावर हा कायदा लागू करणे ठीक असले तरी, ‘शहरी नक्षलवाद’ या अस्पष्ट संकल्पनेखाली संपूर्ण राज्यात हा कायदा लागू करण्याचा प्रयत्न लोकशाहीविरोधी असल्याचे म्हटले आहे.

भीमा कोरेगाव दंगलीनंतरच सरकारला ‘शहरी नक्षलवाद’ दिसू लागला असून, या पोकळ उद्दिष्टाला धरून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे हुकूमशाही आणि दडपशाही पद्धतीने हा कायदा लागू करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. राज्यातील नागरिक, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते हे असंविधानिक काम खपवून घेणार नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. अनेक स्वयंसेवी संस्थांनीही या विधेयकात नक्षलवादाचा साधा उल्लेखही नसल्याबद्दल आक्षेप नोंदवला आहे.

या विधेयकामुळे शासन आणि प्रशासन यंत्रणेच्या विरोधात कोणतेही छोटे-मोठे आंदोलन, निवेदन किंवा टीका-टिपण्णी केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. ही बाब म्हणजे सरळसरळ हुकूमशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मोठा घाव असल्याचे निवेदनात म्हटले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विरोधी पक्षांना सत्ताधारी पक्षांपेक्षा जास्त महत्त्व दिले असताना, महायुती सरकार केवळ नावापुरती चर्चा करून किंवा चर्चा न करताच आपला हुकुमशाही अजेंडा राबवत आहे. भीमा कोरेगाव दंगलीच्या निमित्ताने ‘शहरी नक्षलवाद’ ही फसवी भूमिका पसरवून नागरिकांच्या परिवर्तनवादी भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा सरकारचा हेतू असल्याचे यात म्हटले आहे.

या सरकारने हे विधेयक कोणत्याही परिस्थितीत लागू करू नये, अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. हा कायदा लागू झाल्यास स्वातंत्र्यापूर्वीच्या जीवनमानासारखी परिस्थिती निर्माण होईल, असेही म्हटले आहे. हा कायदा लागू झाल्यास शासन आणि प्रशासनास आत्मदहनाचा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

या निवेदनावर शिवश्री राम अरगडे, योगेश गायकवाड, जाधव नवनाथ, सचिन वरुडे, विशाल युवराज, आदित्य रुपवते, आणि विकी पवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, महसूलमंत्री, जिल्हाधिकारी, पालकमंत्री, आमदार आदींना पाठवण्यात आली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 713
जनसुरक्षा विधायक कायदा राम अरगडे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

By Annant Ppangarkar12/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- शांततेच्या मार्गाने आपल्या हक्कासाठी आवाज उठवणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांवर आणि नागरिकांवर पोलिसांकडून…

सोमवार, १२ ऑक्टोंबर जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

12/10/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

11/10/2026

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.