Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राज्यात नवीन सुधारित युवा धोरण तयार करण्यासाठी समिती गठीत; आमदार सत्यजित तांबे यांचा समावेश
राजकारण

राज्यात नवीन सुधारित युवा धोरण तयार करण्यासाठी समिती गठीत; आमदार सत्यजित तांबे यांचा समावेश

नवीन धोरणाच्या निर्मितीसाठी आणि जुन्या धोरणामध्ये आवश्यक ते बदल करण्यासाठी शासनाने एक उच्चस्तरीय समिती नेमली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/05/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने राज्याच्या नवीन युवा धोरणासंदर्भात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ‘महाराष्ट्र राज्याचे युवा धोरण, २०१२’ या धोरणाच्या आधारे सुधारित युवा धोरण तयार करण्यासाठी एक नवीन समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांचा समावेश करण्यात आला आहे.
विधान परिषदेचे तीन आणि विधानसभेचे तीन अशा सहा आमदारांपैकी तयारी पक्षाचे पाच आमदार या समितीमध्ये असून सत्यजित तांबे या एकमेव अपक्ष आमदाराचा अपवाद वगळता विरोधी पक्षातील एकाही आमदाराला या समितीमध्ये संधी मिळू शकली नाही. या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तांबे यांच्यावरील विशेष प्रेम समोर आले असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.
या संदर्भातील शासन निर्णय २८ मे, २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राज्याच्या युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी एक सक्षम धोरणाची आवश्यकता होती. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र शासनाने २०१२ साली ‘महाराष्ट्र राज्याचे युवा धोरण’ जाहीर केले होते. मात्र, १० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटल्याने, हे धोरण सध्याच्या गरजांनुसार अपुरे पडू लागले होते. त्यामुळे, राज्याच्या युवा धोरणामध्ये सुधारणा करून नवीन धोरण तयार करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
नवीन धोरणाच्या निर्मितीसाठी आणि जुन्या धोरणामध्ये आवश्यक ते बदल करण्यासाठी शासनाने एक उच्चस्तरीय समिती नेमली आहे. या समितीमध्ये अनुभवी मंत्री, अधिकारी आणि तज्ञांचा समावेश असून समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री यांच्यावर सोपविण्यात आली आहे. समितीमधील अन्य सदस्यांमध्ये विधान परिषद सदस्य सत्यजित तांबे, श्रीकांत भारतीय, अमोल मिटकरी यांच्यासह विधानसभा सदस्य संतोष दानवे, राजेश पवार, आशुतोष काळे यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, क्रीडा विभागाचे अपर सचिव, प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय यांचा १ प्रतिनिधी (उपसचिव/ संचालक/ आयुक्त/ सहसंचालक किंवा यापेक्षा वरिष्ठ दर्जाचे अधिकारी), तसेच कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नवोपक्रम विभागाचे १ प्रतिनिधी (उपसचिव/ संचालक/ आयुक्त/ सहसंचालक किंवा यापेक्षा वरिष्ठ दर्जाचे अधिकारी) यांचाही या समितीत समावेश करण्यात आला आहे.
या समितीला राज्याच्या युवकांचे भविष्य उज्ज्वल बनवण्यासाठी एक मजबूत आणि सर्वसमावेशक धोरण तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. हे नवीन धोरण युवकांना शिक्षण, रोजगार, क्रीडा, कौशल्य विकास आणि सामाजिक सहभागाच्या संधी उपलब्ध करून देईल अशी अपेक्षा आहे.
पुढील काळात ही समिती विविध लोकांशी सल्लामसलत करून, सूचना आणि शिफारसींचा विचार करून नवीन युवा धोरणाचा मसुदा तयार करेल. हे नवीन धोरण राज्याच्या विकासात महत्त्वाचे योगदान देईल आणि युवकांना आत्मनिर्भर बनण्यास मदत करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 980
सत्यजित तांबे सुधारित युवा धोरण समिती
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

By Annant Ppangarkar18/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर शहरातील बहुचर्चित आणि वादग्रस्त ठरलेल्या एमडी ड्रग प्रकरणाला आता…

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.