Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

08/10/2026

गुरुवार, ०८ ऑक्टोंबर —- जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

08/10/2026

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त संगमनेरमध्ये विशेष कार्यक्रम, अहिल्याबाई देशातील आदर्श राज्यकर्त्या – बाळासाहेब थोरात
सामाजिक

अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त संगमनेरमध्ये विशेष कार्यक्रम, अहिल्याबाई देशातील आदर्श राज्यकर्त्या – बाळासाहेब थोरात

समतेचा विचार पुढे नेण्यासाठी ३०० व्या जयंतीनिमित्त आणि विविध महापुरुषांच्या जयंतीनिमित्ताने वर्षभरात विविध वैचारिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar31/05/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
संगमनेर – प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्याची कन्या आणि महान राज्यकर्त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त संगमनेर येथे मोठ्या उत्साहात अभिवादन कार्यक्रम पार पडला. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अहिल्यादेवी होळकर यांना ‘देशातील आदर्श राज्यकर्त्या’ असे गौरवले.
संगमनेरमधील आशीर्वाद पतसंस्थेसमोर आयोजित कार्यक्रमात बोलताना थोरात म्हणाले की, अहिल्यादेवींचे सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रातील योगदान अतुलनीय आहे. त्यांनी सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम केले. विशेषतः, पाण्याचे महत्त्व ओळखून जलव्यवस्थापनात त्यांनी मोठी क्रांती घडवली, ज्यामुळे त्या खऱ्या अर्थाने आदर्श राज्यकर्त्या ठरल्या.
भारतीय इतिहासात ज्या महिला राज्यकर्त्या होऊन गेल्या, त्यात अहिल्यादेवींचा गौरव आदर्श राज्यकर्त्या म्हणून केला जातो. मल्हारराव होळकर यांनी चौंडी येथे अहिल्यादेवींना हेरून आपली सून केले. खंडेरावांच्या अकाली निधनानंतरही अहिल्यादेवींनी अत्यंत आदर्शपणे राज्यकारभार सांभाळला.
त्यांनी जलसंधारणाचे महत्त्व ओळखून गावोगावी विहिरी, बंधारे आणि बारवांची निर्मिती केली. दक्षिणेतील रामेश्वरपासून उत्तरेतील केदारनाथपर्यंत आणि पश्चिमेकडील सोमनाथपासून आसामपर्यंत विविध धार्मिक स्थळांवर त्यांनी घाट बांधले. चार धाम, बारा ज्योतिर्लिंग आणि कुंभमेळ्याच्या चारही ठिकाणी मंदिरे उभारली. न्यायव्यवस्था, पोलीस प्रशासन, धर्मशाळा आणि पानवठे यांसारख्या लोककल्याणकारी सुविधांची निर्मिती केली. महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी सती प्रथा बंद केली आणि महिलांना लष्करी प्रशिक्षण दिले. घोंगडीवर बसून कारभार करणाऱ्या अहिल्यादेवींनी २८ वर्षे यशस्वीपणे राज्याचा कारभार सांभाळत आदर्श राजवट निर्माण केली.
अहिल्यादेवी होळकर यांचा संगमनेरशीही मोठा संबंध आहे. त्यांनी संगमनेरमध्ये अनेक मंदिरे आणि बारवांची निर्मिती केली. तसेच, संगमनेरचे प्रसिद्ध कवी अनंत फंदी यांना त्यांनी राजाश्रय दिला होता. त्यांच्या समतेचा विचार पुढे नेण्यासाठी ३०० व्या जयंतीनिमित्त आणि विविध महापुरुषांच्या जयंतीनिमित्ताने वर्षभरात विविध वैचारिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
यावेळी अविनाश शिंदे, प्रा. गणेश गुंजाळ, अण्णासाहेब जगनर, प्राचार्य के. जी. खेमनर, रामदास खेमनर, शेखर सोसे, दिनकर भगत, सुभाष खेमनर, बाळासाहेब गेठे, रुपेश धुळगंड, दादाभाऊ खेमनर यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. शंकरराव खेमनर यांनी केले, सूत्रसंचालन ॲड. अशोक हजारे व नामदेव कहांडळ यांनी केले, तर अण्णासाहेब राहिंज यांनी आभार मानले.
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 584
३०० वी जयंती अहिल्यादेवी होळकर बाळासाहेब थोरात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांचा एक फोन आणि सोयाबीनला ४ हजार रुपयांची मदत; दुष्काळात शेतकऱ्यांना जाणवू लागली अनुभवी नेतृत्वाची उणीव

07/10/2026

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026

ज्ञानेशकुमार हे भाजपाचे निवडणूक जिंकण्याचे हत्यार; एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची माजी मंत्री थोरात यांची जोरदार मागणी

06/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
श्रद्धांजली

ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

By Annant Ppangarkar08/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांचे गुरुवारी पहाटे वयाच्या…

गुरुवार, ०८ ऑक्टोंबर —- जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

08/10/2026

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026

प्रत्येक एफआयआर माझ्यासाठी एखाद्या मेडल प्रमाणे; ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही- राहुल गांधी

07/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.