Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर एसटी आगाराला बा विठ्ठल पावला… तब्बल इतक्या लाखांची कमाई

August 3, 2026

सोमवार, ०३ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 3, 2026

२ लाखांच्या बदल्यात ८ लाखांचे आमिष! खेळण्यातील नोटांचा वापर; ४ भामट्यांवर गुन्हा दाखल, ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’च्या नोटांच्या जोरावर नोटा बदलणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड

August 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » उपमुख्यमंत्री अजित पवारांची कबुली: ‘लाडकी बहीण’ योजनेत चुका झाल्या, आता फक्त पात्र महिलांनाच लाभ!
राजकारण

उपमुख्यमंत्री अजित पवारांची कबुली: ‘लाडकी बहीण’ योजनेत चुका झाल्या, आता फक्त पात्र महिलांनाच लाभ!

लाडकी बहीण योजना लागू केली, तेव्हा निवडणुकीमुळे अर्ज पडताळणीसाठी कमी अवधी होता. निवडणूक आणि आचारसंहितेमुळे अर्ज तपासायला वेळ मिळाला नाही
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJune 2, 2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

पुणे – 

‘लाडकी बहीण’ योजनेसंदर्भात सुरू असलेल्या चर्चांना अखेर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनीच पूर्णविराम दिला आहे. रविवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी या योजनेतील त्रुटींची कबुली दिली. “लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांची अनेक प्रकरणे समोर येत असून, या योजनेत अनेक चुका झाल्या आहेत. सरसकट सर्वांना लाभ देणे चुकीचे होते,” असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.

पवार यांनी यावेळी योजनेच्या अंमलबजावणीतील आव्हानेही स्पष्ट केली. लाडकी बहीण योजना लागू केली, तेव्हा निवडणुकीमुळे अर्ज पडताळणीसाठी कमी अवधी होता. निवडणूक आणि आचारसंहितेमुळे अर्ज तपासायला वेळ मिळाला नाही, असे त्यांनी नमूद केले. या योजनेसाठी मासिक उत्पन्न जास्तीत जास्त वीस हजार आणि वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपर्यंत असलेल्या महिला पात्र होत्या. मात्र, अपात्र महिलांनीही अर्ज केल्याचे समोर आले आहे.

यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, या योजनेतील अर्जांच्या पडताळणीचे काम सध्या सुरू असून, गरजू आणि पात्र महिलांनाच यापुढे लाभ दिला जाईल. अपात्र महिलांना मिळालेले पैसे परत घेण्याचा प्रश्न नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. परंतु, आता केवळ पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळेल, असे त्यांनी अधोरेखित केले.

दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याच्या विषयावर बोलणे त्यांनी टाळले. यामुळे ‘लाडकी बहीण’ योजनेतील पारदर्शकतेवर शासनाचा भर असल्याचे स्पष्ट झाले आहे. भविष्यात या योजनेचा लाभ केवळ खऱ्या अर्थाने गरजू आणि पात्र महिलांनाच मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 870
अजित पवार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याने केंद्रातील गर्विष्ठ सरकारला तरुणाईने नमवले; डॉ. जयश्रीताई थोरात यांचा घणाघात, संगमनेर बस स्थानकावर काँग्रेस आणि पुरोगामी संघटनांचा फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष

July 25, 2026

महाविकास आघाडी आक्रमक; NEET पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांना झालेल्या लाठीमाराविरोधात शुक्रवारी राज्यभर निदर्शने

July 22, 2026

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीमाराच्या विरोधक आक्रमक: राहुल गांधींनी मागितला पंतप्रधान मोदी, अमित शहा अन् धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

July 21, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

संगमनेर एसटी आगाराला बा विठ्ठल पावला… तब्बल इतक्या लाखांची कमाई

By अनंत पांगारकरAugust 3, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क  संगमनेर: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रेसाठी चालवण्यात आलेल्या विशेष ३८ बससेवेच्या माध्यमातून…

सोमवार, ०३ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 3, 2026

२ लाखांच्या बदल्यात ८ लाखांचे आमिष! खेळण्यातील नोटांचा वापर; ४ भामट्यांवर गुन्हा दाखल, ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’च्या नोटांच्या जोरावर नोटा बदलणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड

August 2, 2026

पर्यटकांच्या भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत आरुषी कर्पे या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू

August 2, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.