Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा ४१० कोटींचा निधी वळविला
राजकारण

मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा ४१० कोटींचा निधी वळविला

या निधी वळवण्यामुळे सामाजिक न्याय विभागाच्या योजनांवर आणि अनुसूचित जातींच्या विकासावर काय परिणाम होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/06/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई – 

राज्य सरकारची ‘लाडकी बहीण’ योजना पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे, या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा ४१०.३० कोटी रुपयांचा निधी वळवण्यात आला आहे. अनुसूचित जाती घटकांसाठी असलेला हा निधी आता ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी वापरला जात असल्याने या निर्णयावर पुन्हा एकदा टीकेची शक्यता वर्तवली जात आहे.

सामाजिक न्याय विभागाला वारंवार फटका… ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी यापूर्वीही सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा निधी वळवण्यात आला होता. याआधी निधी वळवल्यामुळे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी जाहीरपणे अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. आता पुन्हा त्यांच्या विभागातून ४१०.३० कोटी रुपये वळवण्यात आले आहेत, यामुळे ही नाराजी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

१८२७ कोटींचा निधी वळवला… आतापर्यंत सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागांचा एकूण १८२७.७० कोटी रुपयांचा निधी महिला व बाल विकास विभागाकडे वळवण्यात आला आहे. यावरून अर्थ विभागाकडून पूर्ण निधी दिला जात असल्याची दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही केला जात आहे.

सामाजिक न्याय विभागाला ७३१७ कोटी कमी निधी… गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यावर्षी सामाजिक न्याय विभागाला ७३१७ कोटी रुपयांचा निधी कमी मिळाला आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये देण्यासाठी सरकार इतर विभागांच्या निधीला कात्री लावत असल्याचे यावरून दिसून येते. मे महिन्याचे पैसे देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या अनुसूचित जाती घटकांसाठी असलेला हा निधी वळवण्यात आला आहे.

आजवर वळवलेला निधी…

* सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग:

* यापूर्वी ४१०.३० कोटी रुपये वळवण्यात आले होते. आता पुन्हा ४१०.३० कोटी रुपये वळवले आहेत. एकूण ८२०.६० कोटी रुपये वळवले.

* आदिवासी विकास विभाग:

* ३ वेळा ३३५.७० कोटी रुपये वळवण्यात आले आहेत. एकूण १००७.१० कोटी रुपये वळवले.

* दोन्ही विभागांचा एकूण वळवलेला निधी: १८२७.७० कोटी रुपये.

निधी वाटपात २.४४ टक्के तूट… आदिवासी आणि सामाजिक न्याय विभागांना लोकसंख्येनुसार निधी वितरित करण्याचा नियम आहे. महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या ११.२३ कोटी असून, त्यापैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या १.३३ कोटी (११.८४ टक्के) आहे. यानुसार सामाजिक न्याय विभागाला एकूण तरतुदीच्या ११.८४ टक्के निधी मिळणे अपेक्षित असताना, त्यांना फक्त ८ ते ८.५ टक्के निधी मंजूर झाला आहे. यामुळे २.४४ टक्के निधीची तूट दिसून येत आहे.

सामाजिक न्याय विभागाला ७३१४ कोटी कमी निधी… यावर्षी सामाजिक न्याय विभागासाठी २९,९७२ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यापैकी सुमारे ५००० कोटी रुपये ‘लाडकी बहीण’ आणि इतर योजनांसाठी राखून ठेवले आहेत. यामुळे सामाजिक न्याय विभागाच्या स्वतःच्या योजनांसाठी केवळ २२,६५८ कोटी रुपये उपलब्ध आहेत. म्हणजेच एकूण अंदाजपत्रकात ७३१४ कोटी रुपयांची तूट दिसून येत आहे.

या निधी वळवण्यामुळे सामाजिक न्याय विभागाच्या योजनांवर आणि अनुसूचित जातींच्या विकासावर काय परिणाम होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 570
निधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वाद
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
नैसर्गिक आपत्ती

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सध्या दुष्काळाची अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झाली असून…

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.