Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले…

August 4, 2026

पठारभागाला वरदान ठरणारे ‘कोटमारा धरण’ ओव्हरफ्लो

August 4, 2026

संगमनेरमध्ये कथित पाकिस्तानी ‘ग्लोरी’ क्रीम विक्रीप्रकरणी शिवसेना आक्रमक; तपासात दिरंगाई झाल्यास करणार ‘असे काही’!

August 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्पपेपरची मागणी नियमबाह्य- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
राजकारण

शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्पपेपरची मागणी नियमबाह्य- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

साध्या कागदावर स्वयं-प्रमाणित शपथपत्र सादर करणे पुरेसे आहे. या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना, विशेषत: ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना स्टॅम्प पेपरवरील खर्चातून मोठा दिलासा मिळत आहे.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJune 8, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
मुंबई । प्रतिनिधी
शासकीय कार्यालयातील ई सेवा केंद्रातून विविध शैक्षणिक दाखले तसेच न्यायालयातील प्रतिज्ञापत्रासाठी १०० अथवा ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरची करण्यात येणारी मागणी नियमबाह्य असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी स्पष्ट केले. त्यामुळे नागरिक, विद्यार्थ्यांकडून स्टॅम्पपेपरची मागणी करण्यात येऊ नये, अशी सक्त ताकीद बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना पत्र लिहून दिली आहे.
बावनकुळे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना पत्र पाठविले आहे. या पत्रात विद्यार्थी, पालक, पक्षकार तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी दोन महिन्यापूर्वी जात पडताळणी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र तसेच न्यायालयासमोर दाखल करायच्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प पेपर रद्द करण्यात आले आहेत.
शासकीय कार्यालयातील प्रमाणपत्रांसाठी आणि न्यायालयात सादर होणाऱ्या शपथपत्रासाठी आता स्टॅम्प पेपरची आवश्यकता नाही, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.
साध्या कागदावर स्वयं-प्रमाणित शपथपत्र सादर करणे पुरेसे आहे. या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना, विशेषत: ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना स्टॅम्प पेपरवरील खर्चातून मोठा दिलासा मिळत आहे. तथापि, काही ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने स्टॅम्पपेपरची मागणी करण्यात येत असल्याच्या तक्रारी येत असल्याने बावनकुळे यांनी कानाडोळा सोडा आणि जनतेला दिलासा द्या, अशा शब्दात अधिकाऱ्यांना बजावले आहे.

तत्कालीन सरकारच्या काळात घेण्यात आलेला हा निर्णय सामान्य माणसाच्या हिताचा आहे. २००४ पासून ही सवलत लागू आहे. वारंवार सरकारच्यावतीने याबाबत सांगण्यात येते. तरीही जिल्हा आणि तालुका प्रशासन याकडे दुर्लक्ष करणार असेल तर कारवाई केली जाईल. सर्वसामान्य जनतेला अकारण वेठीस धरणाऱ्यांना माफी नाही. – चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 450
चंद्रशेखर बावनकुळे प्रतिज्ञापत्र
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये कथित पाकिस्तानी ‘ग्लोरी’ क्रीम विक्रीप्रकरणी शिवसेना आक्रमक; तपासात दिरंगाई झाल्यास करणार ‘असे काही’!

August 4, 2026

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याने केंद्रातील गर्विष्ठ सरकारला तरुणाईने नमवले; डॉ. जयश्रीताई थोरात यांचा घणाघात, संगमनेर बस स्थानकावर काँग्रेस आणि पुरोगामी संघटनांचा फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष

July 25, 2026

महाविकास आघाडी आक्रमक; NEET पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांना झालेल्या लाठीमाराविरोधात शुक्रवारी राज्यभर निदर्शने

July 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
श्रद्धांजली

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले…

By अनंत पांगारकरAugust 4, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  कोल्हापूर: देशातील प्रमुख शिक्षणसंस्थांचे प्रणेते, माजी राज्यपाल आणि ‘पद्मश्री’ पुरस्कारविजेते ज्ञानदेव…

पठारभागाला वरदान ठरणारे ‘कोटमारा धरण’ ओव्हरफ्लो

August 4, 2026

संगमनेरमध्ये कथित पाकिस्तानी ‘ग्लोरी’ क्रीम विक्रीप्रकरणी शिवसेना आक्रमक; तपासात दिरंगाई झाल्यास करणार ‘असे काही’!

August 4, 2026

शेतकऱ्यांची गैरसोय न थांबल्यास संगमनेर तहसील कार्यालयासमोर ‘घंटानाद आंदोलन’, वंचित बहुजन आघाडीचा इशारा

August 4, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.