Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

19/09/2026

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महिला अधिकाऱ्याच्या छळप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यांना प्रवेशबंदी; राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ
राजकारण

महिला अधिकाऱ्याच्या छळप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यांना प्रवेशबंदी; राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ

हे प्रकरण आता पुणे शहरात राजकीय आणि प्रशासकीय दृष्ट्या संवेदनशील बनले असून, तक्रारीची चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचे पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/06/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

पुणे – 

पुणे महानगरपालिकेतील एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला मानसिक त्रास देऊन सातत्याने छळ केल्याच्या आरोपानंतर भारतीय जनता पार्टी (भाजप) कामगार आघाडीचे पुणे शहराध्यक्ष ओंकार कदम आणि त्यांचे सहकारी अक्षय कांबळे यांना पुणे महापालिकेत प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत, ज्यामुळे हे प्रकरण राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहे.

संबंधित महिला अधिकाऱ्याने केलेल्या आरोपानुसार, गेल्या पाच महिन्यांपासून ओंकार कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून तिला सातत्याने त्रास दिला जात होता. यामध्ये जबरदस्तीने तिच्या दालनात प्रवेश करून छायाचित्रण करणे, दरवाजा बंद करून दमदाटी करणे, आणि अपमानास्पद भाषा वापरणे अशा घटनांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, यासंदर्भात यापूर्वी तक्रारी करूनही भाजप नेत्यांकडून कोणतीही दखल घेण्यात आली नव्हती, असेही महिला अधिकाऱ्याने नमूद केले आहे.

या सततच्या छळाला कंटाळून पीडित महिला अधिकाऱ्याने थेट राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. त्याचबरोबर, तिने पुणे महापालिकेच्या अंतर्गत तक्रार समितीकडेही धाव घेतली होती. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, १७ फेब्रुवारी २०२५ रोजी काही कार्यकर्त्यांनी महिला अधिकाऱ्यांच्या कार्यकक्षात घुसून गोंधळ घातल्याची आणि कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, प्रतिबंधन व प्रतितोष) कायदा २०१३ अंतर्गत घटना घडल्याची नोंद करण्यात आली आहे.

या तक्रारींची गंभीर दखल घेत महापालिका प्रशासनाने तत्काळ पावले उचलली आहेत. आयुक्त नवल किशोर राम यांनी ओंकार कदम आणि अक्षय कांबळे यांना पुढील आदेशापर्यंत महापालिकेत प्रवेशबंदीचा आदेश दिला आहे. यामुळे महापालिकेत महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, ओंकार कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, मी कोणत्याही महिला अधिकाऱ्याला त्रास दिलेला नाही. माहिती अधिकारात विचारलेल्या माहितीमुळेच ही तक्रार करण्यात आली आहे. तसेच, चौकशीत दोषी आढळल्यास आपण पक्षाच्या पदाचा राजीनामा देण्यास तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कदम यांनी आरोग्य विभागातील ‘शहरी गरीब योजना’ या योजनेत सात वर्षांपासून भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप करत, आपण ही माहिती उघडकीस आणत असल्यानेच आपल्याविरोधात तक्रार दाखल केल्याचे म्हटले आहे.

हे प्रकरण आता पुणे शहरात राजकीय आणि प्रशासकीय दृष्ट्या संवेदनशील बनले असून, तक्रारीची चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचे पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 896
पुणे महानगरपालिका प्रवेश बंदी भाजप
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

By Annant Ppangarkar19/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू असलेला…

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.