Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज रविवार, २० सप्टेंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

20/09/2026

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

19/09/2026

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवा सेनेच्या संगमनेरमधील रिक्त जागांवर नव्या नियुक्त्या; आगामी निवडणुकांवर लक्ष… जिल्हाप्रमुख अमित चव्हाण यांनी दिली माहिती
राजकारण

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवा सेनेच्या संगमनेरमधील रिक्त जागांवर नव्या नियुक्त्या; आगामी निवडणुकांवर लक्ष… जिल्हाप्रमुख अमित चव्हाण यांनी दिली माहिती

'आजची युवासेना हीच भविष्याची शिवसेना आहे' आणि 'युवक सक्षम तर महाराष्ट्र सक्षम' या विचाराने युवक, विद्यार्थी आणि नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी या नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/06/2025Updated:11/06/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
संगमनेर, ११ जून २०२५ 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विचारात घेता सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवा सेनेने संगमनेरमधील काही रिक्त पदांवर नवीन नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अमित चव्हाण यांनी ही माहिती दिली.

यापूर्वीची कार्यकारिणी कायम ठेवत, पक्षाच्या वरिष्ठांच्या निर्देशानुसार रिक्त झालेल्या जागांवर या नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. ज्या नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या आहेत, त्यात पंकज पडवळ (युवा सेना उपजिल्हाधिकारी, ग्रामीण), लक्ष्मण सोन्नर (युवा सेना पठार भाग तालुका अधिकारी) आणि सागर भागवत (युवा सेना तालुका अधिकारी, तळेगाव भाग) यांचा समावेश आहे.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, तसेच युवासेना सचिव आमदार वरूण सरदेसाई, शिर्डी लोकसभा युवासेना विस्तारक मितेश साटम यांच्या आदेशाने आणि युवासेना जिल्हाप्रमुख (शिर्डी लोकसभा) अमित चव्हाण यांच्या विनंतीनुसार या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
पक्षाने या निवडींचे महत्त्व अधोरेखित करत म्हटले आहे की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि इतर निवडणुकांमध्ये शिवसेना पक्षाची वाढ होण्यासाठी या नियुक्त्या महत्त्वपूर्ण ठरतील. ‘आजची युवासेना हीच भविष्याची शिवसेना आहे’ आणि ‘युवक सक्षम तर महाराष्ट्र सक्षम’ या विचाराने युवक, विद्यार्थी आणि नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी या नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. मागील नियुक्त केलेली युवासेनेची संपूर्ण कार्यकारिणी कायम ठेवण्यात आली आहे.
याप्रसंगी, युवासेना शिर्डी लोकसभा विस्तारक मितेश साटम यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. येणाऱ्या संगमनेर नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये ‘आपला पक्ष आपली निष्ठा उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हेच समजून कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
नवनियुक्त युवासेना पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करणाऱ्यांमध्ये युवासेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, युवासेना जिल्हा समन्वयक फैसल सय्यद, युवासेना उपजिल्हाप्रमुख (शहर) वैभव अभंग, युवासेना तालुकाप्रमुख अक्षय गुंजाळ, युवासेना शहर प्रमुख गोविंद नागरे, युवासेना विधानसभा प्रमुख अमोल डुकरे, युवासेना माजी पठार भाग तालुका प्रमुख योगेश खेमनर, उपशहर प्रमुख अक्षय गाडे, उप तालुकाप्रमुख फैरोज कतारी, सचिन साळवे आणि परवेज शेख यांचा समावेश आहे.
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,028
पंकज पडवळ पदाधिकारी निवडी युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राजकारण
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज रविवार, २० सप्टेंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

By Annant Ppangarkar20/09/20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साह आणि नवीन ऊर्जा घेऊन आला आहे. कार्यक्षेत्रात…

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

19/09/2026

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.