Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सोमवार, ०३ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 3, 2026

२ लाखांच्या बदल्यात ८ लाखांचे आमिष! खेळण्यातील नोटांचा वापर; ४ भामट्यांवर गुन्हा दाखल, ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’च्या नोटांच्या जोरावर नोटा बदलणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड

August 2, 2026

पर्यटकांच्या भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत आरुषी कर्पे या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू

August 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शौचालयाच्या वादातून महिलेची हत्या; संगमनेरजवळील कर्जुलेपठार येथील घटना, अन्य एका महिलेवर चाकू हल्ला
गुन्हेगारी

शौचालयाच्या वादातून महिलेची हत्या; संगमनेरजवळील कर्जुलेपठार येथील घटना, अन्य एका महिलेवर चाकू हल्ला

रुपाली ज्ञानदेव वाघ असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून मोनिका वाघ असे जखमी महिलेचे नाव आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJune 11, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी

शौचालयासाठी शेतात जाण्यावरून झालेल्या वादानंतर संगमनेर तालुक्यातील कर्जुलेपठार येथे एका महिलेची चाकूने भोसकून हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात मयत महिलेची नणंदही गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर लोणी येथील प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रुपाली ज्ञानदेव वाघ असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून मोनिका वाघ असे जखमी महिलेचे नाव आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

कर्जुलेपठार येथील रहिवासी अजित दादाभाऊ वाघ (वय २५) यांनी संदर्भात घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या घराजवळच मुरलीधर रामकृष्ण पडवळ यांचे कुटुंब राहते. घरात शौचालय नसल्याने वाघ कुटुंबीय अनेकदा मुरलीधर पडवळ यांच्या शेतात शौचालयासाठी जात असे. मंगळवारी (१० जून) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अजित वाघ यांची वहिनी, रुपाली ज्ञानदेव वाघ या शौचालयासाठी पडवळ यांच्या शेतात गेल्या होत्या. त्यावेळी विक्रम पडवळ तिथे आला आणि त्याने रुपाली यांना तुम्ही आमच्या शेतात शौचालयासाठी का जाता? असे म्हणत शिवीगाळ केली.

या घटनेनंतर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अजित वाघ, त्यांचे भाऊ ज्ञानदेव वाघ, वहिनी रुपाली वाघ आणि बहीण मोनिका दादाभाऊ वाघ हे विक्रम पडवळ यांच्या घरी त्यांना समजावून सांगण्यासाठी गेले. त्यावेळी विक्रम पडवळ, मुरलीधर पडवळ आणि अलका पडवळ यांनी त्यांना शिवीगाळ केली. वाघ कुटुंबीयांनी आपली चूक झाली असून, आपण माफी मागतो असे सांगितले असता, मुरलीधर पडवळ यांनी जातीय शिवीगाळ केली. तसेच संतापलेल्या विक्रम पडवळ याने आता तुम्हाला जिवंत सोडणार नाही असे म्हणत घरातून धारदार चाकू घेऊन आला. अलका पडवळ हिने रुपाली वाघ यांचे हात धरले आणि विक्रम पडवळने त्यांच्या पोटाच्या डाव्या बाजूला चाकू खुपसला. रुपाली यांना वाचवण्यासाठी त्यांची नणंद मोनिका दादाभाऊ वाघ धावली असता, विक्रम पडवळने तिच्याही कमरेच्या जवळ चाकूने वार करून तिला गंभीर जखमी केले.

तत्काळ वाघ यांनी रुपाली आणि मोनिका यांना मोटरसायकलवरून साकुर फाटा येथे नेले. तिथून खाजगी रुग्णवाहिकेतून त्यांना संगमनेर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारांसाठी लोणी येथील प्रवरा रुग्णालयात पाठवले. प्रवरा रुग्णालयात उपचारादरम्यान, बुधवारी (११ जून) मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास रुपाली ज्ञानदेव वाघ यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले तर मोनिका वाघ यांच्यावर अद्याप प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी, अजित वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुरलीधर रामकृष्ण पडवळ, विक्रम मुरलीधर पडवळ, आणि अलका विक्रम पडवळ (सर्व रा. कर्जुलेपठार, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घारगाव पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,573
कर्जुले पठार हत्या
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

२ लाखांच्या बदल्यात ८ लाखांचे आमिष! खेळण्यातील नोटांचा वापर; ४ भामट्यांवर गुन्हा दाखल, ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’च्या नोटांच्या जोरावर नोटा बदलणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड

August 2, 2026

‘गोरी’ क्रीमच संगमनेर कनेक्शन उघड; पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त, दुकानदार ताब्यात

August 2, 2026

संगमनेर शहरात बेकायदेशीर गोमांस वाहतूक उघडकीस; ६ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त, आरोपी पसार

August 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

सोमवार, ०३ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By अनंत पांगारकरAugust 3, 20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साही आणि फलदायी राहील. कामाच्या ठिकाणी नवी…

२ लाखांच्या बदल्यात ८ लाखांचे आमिष! खेळण्यातील नोटांचा वापर; ४ भामट्यांवर गुन्हा दाखल, ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’च्या नोटांच्या जोरावर नोटा बदलणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड

August 2, 2026

पर्यटकांच्या भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत आरुषी कर्पे या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू

August 2, 2026

‘गोरी’ क्रीमच संगमनेर कनेक्शन उघड; पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त, दुकानदार ताब्यात

August 2, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.