Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज रविवार, २० सप्टेंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

20/09/2026

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

19/09/2026

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ‘मॅच फिक्सिंग’चा माजी मंत्री बाळासाहेब थोरातांचा गंभीर आरोप: निवडणूक आयोग भाजपसाठी काम करतोय; लोकशाही वाचवण्यासाठी लढा सुरूच राहणार
राजकारण

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ‘मॅच फिक्सिंग’चा माजी मंत्री बाळासाहेब थोरातांचा गंभीर आरोप: निवडणूक आयोग भाजपसाठी काम करतोय; लोकशाही वाचवण्यासाठी लढा सुरूच राहणार

अहिल्यानगर जिल्ह्यातील एका वसतिगृहात ७००० मतदारांची नोंदणी झाल्याचा आणि त्यांना निवडणूक ओळखपत्रेही मिळाल्याचा धक्कादायक प्रकारही त्यांनी निदर्शनास आणून दिला.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/06/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
संगमनेर, प्रतिनिधी – 
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षांनी ‘मॅच फिक्सिंग’ केल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. निवडणूक आयोग आता स्वायत्त राहिलेला नसून, तो भाजपसाठी काम करत असल्याचा थेट दावा थोरात यांनी केला आहे. सत्तेसाठी भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष कोणत्याही थराला जाऊ शकतात, असेही त्यांनी म्हटले आहे. दिल्लीत दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी हे स्फोटक विधान केले आहे.
काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य असलेल्या बाळासाहेब थोरात यांनी या मुलाखतीत सांगितले की, लोकसभा विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील गैरप्रकारांबाबत सरकार आणि निवडणूक आयोगाला अनेकदा प्रश्न विचारले आहेत. मात्र, अद्यापही निवडणूक आयोगाने समाधानकारक उत्तरे दिलेली नाहीत. जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी काही मंत्री उत्तरे देत असले तरी, ही उत्तरे देण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे.
थोरात यांनी निवडणूक प्रक्रियेतील अनेक संशयास्पद बाबींवर प्रकाश टाकला. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभेलाही महाविकास आघाडीसाठी अनुकूल वातावरण होते. तरीही वाढलेले मतदार, मतदानाच्या शेवटच्या तासात अचानक वाढलेला टक्का आणि भाजपचा १४९ पैकी १३२ जागांवर विजय, म्हणजेच मोठा स्ट्राईक रेट संशयास्पद वाटतो, असे त्यांनी म्हटले. जनतेच्या मनात आजही ईव्हीएमबद्दल शंका आहे. अनेक ठिकाणी बोगस मतदान झाले, मतदार इतके कसे वाढले, तर काही ठिकाणी लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार नोंदणी कशी झाली, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. विशेषतः, शेवटच्या तासात अचानक सहा लाख मतदान कसे वाढले, हे कोडे आहे असे थोरात म्हणाले.
अहिल्यानगर जिल्ह्यातील एका वसतिगृहात ७००० मतदारांची नोंदणी झाल्याचा आणि त्यांना निवडणूक ओळखपत्रेही मिळाल्याचा धक्कादायक प्रकारही त्यांनी निदर्शनास आणून दिला. भाजप आणि मित्रपक्ष जिंकण्यासाठी कोणत्याही स्तराला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणूक आयोग स्वायत्त असणे अपेक्षित असताना, तो आता भाजपसाठी काम करत असल्याचा पुनरुच्चार थोरात यांनी केला.
व्हीव्हीपॅट स्लिप्स नाकारल्याने संशय वाढला – निवडणूक निकालानंतर व्हीव्हीपॅटच्या स्लिप्स मिळायला हव्या होत्या, परंतु निवडणूक आयोगाने त्या नाकारल्या, ही बाबही संशयास्पद आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे १५७ उमेदवार विजयी होतील, अशी खात्री होती, मात्र मतदार वाढवण्याचे त्यांचे पूर्वनियोजित राजकारण होते, असे म्हणत अनैतिक राजकारण लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
खासदार राहुल गांधींच्या प्रश्नांना उत्तरे मिळत नाहीत आणि निवडणूक आयोगाऐवजी दुसरेच लोक उत्तरे देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्तेसाठी काहीही करणाऱ्या भाजपने महाराष्ट्र विधानसभेत ‘मॅच फिक्सिंग’ केली असल्याचा आरोप करताना, देशाची लोकशाही आणि राज्यघटना टिकली पाहिजे, यासाठी आपला लढा सुरू राहील, असे थोरात यांनी नमूद केले.
संगमनेरच्या निकालावरही प्रश्नचिन्ह – महाराष्ट्र काँग्रेसमधील एक वरिष्ठ नेते म्हणून बाळासाहेब थोरात यांची ओळख आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघातून ते सलग आठवेळा विक्रमी मताधिक्याने विजयी झाले आहेत. काँग्रेस आणि महाविकास आघाडीसाठी संगमनेर मतदारसंघ हा अत्यंत खात्रीचा आणि विश्वासाचा मानला जात होता. थोरात यांचा विजय निश्चित मानला जात असताना, अनपेक्षित निकाल लागल्याने संगमनेरचा निकाल हा राज्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी धक्कादायक ठरला. ‘असे कसे होऊ शकते?’ हा मोठा प्रश्न राज्यात उपस्थित झाला. अत्यंत अभ्यासू, शांत, संयमी आणि लोकशाहीवर श्रद्धा असलेल्या माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत केलेल्या या वक्तव्यावर देशात गांभीर्याने विचार सुरू झाला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,102
निवडणूक आयोग बाळासाहेब थोरात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज रविवार, २० सप्टेंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

By Annant Ppangarkar20/09/20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साह आणि नवीन ऊर्जा घेऊन आला आहे. कार्यक्षेत्रात…

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

19/09/2026

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.