Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

17/09/2026

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

गुरुवार, १७ सप्टेंबर — जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » चोरून विकण्याच्या उद्देशाने बेकायदा वाळू साठा करणाऱ्या पाच तर वाळू वाहतूक करणाऱ्या एका तस्करावर गुन्हा दाखल, साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त! काही दिवसापूर्वी आमदार खताळ यांनी पकडून दिली होती दोन वाहने
गुन्हेगारी

चोरून विकण्याच्या उद्देशाने बेकायदा वाळू साठा करणाऱ्या पाच तर वाळू वाहतूक करणाऱ्या एका तस्करावर गुन्हा दाखल, साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त! काही दिवसापूर्वी आमदार खताळ यांनी पकडून दिली होती दोन वाहने

आमदार खताळ यांनी काही दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी वाळू वाहतूक करणारी दोन वाहने पकडून संबंधितांच्या ताब्यात दिली होती.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/06/2025Updated:13/06/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी – 

शहरालगत असणाऱ्या खांडगाव शिवारात प्रवरा नदीपात्रातून बेकायदा वाळू वाहतूक करण्याच्या उद्देशाने सुमारे ४० ब्रास वाळू साठा करणाऱ्या वाळू तस्करांवर आणि पिकअपमधून वाळू वाहतूक करणाऱ्या एका अशा सहा जणांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान वाळू वाहतूक करणारा वाहनचालक कारवाईदरम्यान पळून गेला असल्याची माहिती मिळाली.

तलाठी प्रवीण डहाके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात शरद कारभारी गुंजाळ, गणेश बालोडे, सुनील बोऱ्हाडे, बबलू सातपुते, लहानु बालोडे, निकुंज सुधीर ढोले या सहा वाळू तस्करांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशासन या प्रकरणे आता या तस्करांवर नेमकी काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे.

वाळू तस्करी रोखण्यात अपयश आलेल्या महसूल पोलीस या प्रशासना विरोधात संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांना रस्त्यावर उतरावे लागले होते. आमदार खताळ यांनी काही दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी वाळू वाहतूक करणारी दोन वाहने पकडून संबंधितांच्या ताब्यात दिली होती. त्यानंतर प्रशासनाने कारवाईसाठी पावले उचलली असली तरीदेखील शहर आणि तालुक्यातील आढळा, म्हाळुंगी, प्रवरा आणि मुळा या नद्यांच्या नदीपात्रांमधून सर्रासपणे वाळू उपसा सुरूच असल्याचे वारंवार समोर आले. महसूल, स्थानिक पोलीस, श्रीरामपूर पोलीस आणि अहिल्यानगरच्या एलसीबीच्या तस्करांसोबत असलेल्या आर्थिक व्यवहाराची चर्चा सातत्याने होत असते. या कारवाईमुळे ही वाळू तस्करी सुरूच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

तलाठी प्रवीण डहाके यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बुधवारी सायंकाळी सहा ते आठ वाजण्याच्या दरम्यान खांडगाव शिवारात नदीपात्रामध्ये निकुंज सुधीर ढोले हा पीक अप मधून अर्धा ब्रास वाळूची वाहतूक करताना आढळून आला. तसेच शरद कारभारी गुंजाळ, गणेश बालोडे, सुनील बोऱ्हाडे, बबलू सातपुते, लहानु बालोडे, निकुंज सुधीर ढोले यांनी तीन ट्रॅक्टरच्या सहाय्याने ४० ब्रास वाळूची चोरी करून विक्री करण्याच्या उद्देशाने साठा करून ठेवल्याचे निदर्शनास आले. कारवाई मध्ये ५ लाख ३३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल डुंबरे या करीत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,068
कारवाई वाळू उत्खनन वाळू चोरी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

By Annant Ppangarkar17/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील राजापूरच्या जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या निवड…

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

गुरुवार, १७ सप्टेंबर — जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

17/09/2026

संगमनेरमध्ये युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांसाठी विशेष आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण शिबिर; आपत्कालीन प्रसंगात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा: डॉ. जयश्रीताई थोरात

16/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.