Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » लाच लुचपतच्या नाशिक युनिटने अहिल्यानगरमध्ये बँक रिकव्हरी कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडले
गुन्हेगारी

लाच लुचपतच्या नाशिक युनिटने अहिल्यानगरमध्ये बँक रिकव्हरी कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडले

आरोपीच्या अंगझडतीत एक मोबाईल फोन सापडला असून त्याच्या घराची झडती घेण्यात आली त्यात काहीही आक्षेपार्ह आढळले नाही.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/06/2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर, १८ जून: 

नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अहिल्यानगरमध्ये  मंगळवारी एका खासगी बँक रिकव्हरी कर्मचाऱ्याला २०,००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. घर जप्तीच्या नोटीसची तारीख वाढवण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, ४२ वर्षीय तक्रारदाराला भिंगारच्या मंडळ अधिकारी कार्यालयाकडून घर जप्तीची नोटीस बजावण्यात आली होती. या नोटीसची तारीख मंडळ अधिकाऱ्यांकडून वाढवून देण्यासाठी, जहीर अहमद इक्बाल मुलानी (वय ३०, रा. एकनाथ नगर, केडगाव, अहिल्यानगर) या खासगी बँक रिकव्हरी कर्मचाऱ्याने २०,००० रुपयांची मागणी केली.

तडजोडीअंती २०,००० रुपये लाच स्वीकारण्याचे निश्चित झाले. त्यानुसार, १७ जून २०२५ रोजी दुपारी साडेबारा वाजता जहीर मुलानी याने पंचांसमक्ष २०,००० रुपयांची लाच स्वीकारली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तात्काळ कारवाई करत त्याला रंगेहाथ पकडले आणि लाचेची रक्कम हस्तगत केली.

या प्रकरणी आरोपी जहीर मुलानी याच्या विरोधात भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन, अहिल्यानगर येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपीच्या अंगझडतीत एक मोबाईल फोन सापडला असून त्याच्या घराची झडती घेण्यात आली त्यात काहीही आक्षेपार्ह आढळले नाही. आरोपीचा मोबाईल फोन पुढील तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 779
लाचखोरी लाचलुचपत
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

By Annant Ppangarkar18/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – तालुक्याचा विकास हा कष्टातून उभा राहिला असून केवळ मोबाईलवर अफवा…

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026

वैद्यकीय क्षेत्र समाजसेवेचे प्रभावी माध्यम; डॉक्टरांनी सेवा भाव जपावा : डॉ. सतिष महाजन

18/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.