Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज रविवार, २० सप्टेंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

20/09/2026

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

19/09/2026

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राजकीय आणि सामाजिक आंदोलनांतील प्रलंबित खटल्यासंदर्भात गृह विभागाचा महत्त्वाचा निर्णय
राजकारण

राजकीय आणि सामाजिक आंदोलनांतील प्रलंबित खटल्यासंदर्भात गृह विभागाचा महत्त्वाचा निर्णय

शासनाचे लक्ष वेधण्यासाठी घेराव घालणे, मोर्चे काढणे, निदर्शने करणे इत्यादी स्वरूपाची आंदोलने केली जातात.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/06/2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई, २१ जून, २०२५: 

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राजकीय आणि सामाजिक आंदोलनांमुळे दाखल झालेल्या गुन्ह्यांमधील खटले मागे घेण्यासंदर्भात शुक्रवारी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या नवीन शासन निर्णयानुसार, ३१ मार्च, २०२५ पर्यंत ज्या गुन्ह्यांमध्ये दोषारोपपत्रे दाखल झाली आहेत, ते खटले आता मागे घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.

यापूर्वी, शासनाने ३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत दोषारोपपत्रे दाखल झालेल्या खटल्यांसाठी हे धोरण लागू केले होते. मात्र, ती मुदत संपल्याने आणि त्यानंतरही काही गुन्ह्यांमध्ये दोषारोपपत्रे दाखल झाल्याने, खटले मागे घेण्याच्या कालावधीत वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

या संदर्भात, गृह विभागाने यापूर्वी २० सप्टेंबर, २०२२, १० नोव्हेंबर, २०२२, १४ सप्टेंबर, २०२३, १२ फेब्रुवारी, २०२४, आणि ३१ जुलै, २०२४ रोजी शासन निर्णय निर्गमित केले आहेत. २० सप्टेंबर, २०२२ रोजीच्या शासन निर्णयातील अटी, शर्ती आणि तरतुदी कायम राहतील, असेही या नवीन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून, त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०२५०६२०१६१००८७३२९ असा आहे. हा निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात आला आहे.

राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांकडून सार्वजनिक हिताच्या आणि विविध समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी घेराव घालणे, मोर्चे काढणे, निदर्शने करणे इत्यादी स्वरूपाची आंदोलने केली जातात. यामुळे त्यांच्याविरुद्ध कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हे दाखल होऊन, तपासानंतर न्यायालयात दोषारोपपत्रे दाखल केली जातात.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 661
आंदोलन शासन निर्णय
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

19/09/2026

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज रविवार, २० सप्टेंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

By Annant Ppangarkar20/09/20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साह आणि नवीन ऊर्जा घेऊन आला आहे. कार्यक्षेत्रात…

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

19/09/2026

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.