Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज रविवार, १३ सप्टेंबर— जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

13/09/2026

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

12/09/2026

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » एसपींच्या विशेष पथकाची कारवाई: संगमनेर शहरात दोन ठिकाणी छापे, ३५ लोकांवर कारवाई; १० लाखांवर मुद्देमाल हस्तगत
गुन्हेगारी

एसपींच्या विशेष पथकाची कारवाई: संगमनेर शहरात दोन ठिकाणी छापे, ३५ लोकांवर कारवाई; १० लाखांवर मुद्देमाल हस्तगत

प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे, पोलीस निरीक्षक वाघ, पोलीस निरीक्षक देशमुख, पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग या कारवाई वेळी उपस्थित होते.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/06/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी- 

जिल्हा पोलीस प्रमुखांच्या विशेष पथकाने काल, (२० जून) संगमनेर शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून एकूण ३५ लोकांवर कारवाई केली आहे. पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

संगमनेरमध्ये थेट पोलीस अधीक्षकांच्या पथकाने केलेल्या या मोठ्या कारवाईनंतर आता संगमनेरमधील अन्य अवैध धंद्यांकडे लक्ष लागले आहे. स्थानिक पोलीस, एलसीबी हे अवैध धंदे बंद करण्यात यश मिळवितात की हे धंदे सुरूच राहतात हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. मात्र पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने अशा कारवाया करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

संगमनेर शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी पावणे सहा वाजता तेलीखुंट परिसरातील एका पत्र्याच्या खोलीत सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत मटका पेढी चालकासह २९ जनांवर कारवाई करण्यात आली. छाप्यात पथकाने ७४,६५०/- रुपये रोख रक्कम, विविध प्रकारच्या ९ मोटारसायकली (एकूण किंमत ४,३५,०००/- रुपये), वेगवेगळ्या कंपन्यांचे २२ मोबाईल फोन (एकूण किंमत २,२६,०००/- रुपये) आणि मटका खेळण्याचे साहित्य असा एकूण ७,३५,६५०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल आत्माराम पवार यांच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) नुसार गुन्हा (गु.र.नं. ५६७/२०२५) दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

पथकाने दुसरा छापा सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कोल्हेवाडी रस्त्यावर एका उघड्या जागेत सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर टाकला. या कारवाईत पेढी चालकासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात कारवाईत पोलिसांनी ५३,६६०/- रुपये रोख रक्कम, आकडेमोड केलेल्या चिठ्ठ्या, एक बॉल पेन, १,१२,०००/- रुपये किमतीचे ८ मोबाईल फोन आणि १,४५,०००/- रुपये किमतीच्या ३ मोटारसायकली (एक सुझुकी ॲक्सेस १२५, एक सुझुकी बर्गमन आणि एक फेरांझिया इलेक्ट्रिक मोटार सायकल) असा एकूण ३,१०,६६०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी पोलीस शिपाई संतोष बाचकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) नुसार गुन्हा (गु.र.नं. ५६६/२०२५) दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग करत आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे, पोलीस निरीक्षक वाघ, पोलीस निरीक्षक देशमुख, पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग या कारवाई वेळी उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 938
छापा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026

बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा छापा; विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोघांना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज रविवार, १३ सप्टेंबर— जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

By Annant Ppangarkar13/09/20260

आजचे राशिभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी नवी जबाबदारी…

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

12/09/2026

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.