Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

11/10/2026

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » धक्कादायक! श्रीगोंद्याचे तलाठी आणि तरुणीचा कोकणकड्यात दुर्दैवी अंत;आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती
महाराष्ट्र संवाद विशेष

धक्कादायक! श्रीगोंद्याचे तलाठी आणि तरुणीचा कोकणकड्यात दुर्दैवी अंत;आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती

जुन्नर रेस्क्यू टीमचे रुपेश जगताप, राजकुमार चव्हाण आणि पोलिस कर्मचारी रघुनाथ शिंदे, गणेश शिंदे, दादा पावडे यांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी श्री शिवछत्रपती ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/06/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील दुर्गावाडी येथील कोकणकडा परिसरात सुमारे १२०० फूट खोल दरीत दोन मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासातून दोघांनी आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. मृतांमध्ये श्रीगोंद्याचे तलाठी आणि एका महाविद्यालयीन तरुणीचा समावेश आहे. या घटनेमुळे दोघांनी हे टोकाचं पाऊल का उचललं, याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

मृत व्यक्तींची नावे रामचंद्र साहेबराव पारधी (वय ४०) आणि महाविद्यालयीन तरुणी रुपाली संतोष खुटाण (आंबोली, ता. जुन्नर) अशी असून पारधी हे अहिल्या नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात तलाठी म्हणून कार्यरत आहेत. जुन्नर पोलिस आणि रेस्क्यू टीमने कठीण परिस्थितीत मृतदेह दरीतून बाहेर काढले. दोघेही बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांत दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामचंद्र पारधी हे मूळचे दुर्गावाडी येथील असून, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात तलाठी म्हणून कार्यरत होते. गेल्या काही दिवसांपासून ते बेपत्ता होते आणि त्यांच्या पत्नीने अहमदनगरच्या तोफखाना पोलिस ठाण्यात त्यांची बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. तसेच, रुपाली देखील काही दिवसांपासून बेपत्ता होती आणि तिच्या अपहरणाचा गुन्हा जुन्नर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.

जुन्नरच्या रिव्हर्स वॉटर फॉलजवळ एक पांढऱ्या रंगाची कार काही दिवसांपासून उभी असल्याचे स्थानिक ग्रामस्थांना दिसले. त्यानंतर शोधाशोध केली असता, दरीच्या कठड्याच्या टोकावर पुरुष आणि स्त्रीच्या चपला आढळून आल्या. यामुळे संशय आणखी बळावला. रविवारी (२२ जून) रोजी दाट धुके, पाऊस आणि अंधारामुळे शोधकार्य थांबवण्यात आले होते. काल (सोमवार, २३ जून) सकाळी रेस्क्यू टीमने दरीत उतरून शोध घेतला असता, रुपाली आणि रामचंद्र यांचे मृतदेह आढळून आले. त्यानंतर रेस्क्यू टीमने त्यांचे मृतदेह बाहेर काढले.

जुन्नर रेस्क्यू टीमचे रुपेश जगताप, राजकुमार चव्हाण आणि पोलिस कर्मचारी रघुनाथ शिंदे, गणेश शिंदे, दादा पावडे यांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी श्री शिवछत्रपती ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,287
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

06/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

By Annant Ppangarkar11/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यात विविध ठिकाणांहून देवीच्या पायी ज्योती आणण्याची धार्मिक…

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

रविवार ११ ऑक्टोबर २०२६ — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

11/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.