Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज रविवार, २० सप्टेंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

20/09/2026

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

19/09/2026

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘गुरखा’ अग्निशमनचे लोकार्पण: संगमनेरच्या विकासासाठी भरीव निधी आणणार: आ. खताळ
राजकारण

‘गुरखा’ अग्निशमनचे लोकार्पण: संगमनेरच्या विकासासाठी भरीव निधी आणणार: आ. खताळ

मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी अल्पावधीतच संपूर्ण शहरात शिस्तीचे वातावरण निर्माण केल्याचे कौतुक करत, अजूनही सत्ता असल्याच्या थाटात वागणाऱ्या काही माजी नगरसेवकांवर उपाययोजना करण्याचे सक्त निर्देशही आमदार खताळ यांनी दिले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/06/2025Updated:24/06/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
संगमनेर, प्रतिनिधी: 
संगमनेर नगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन करत आमदार अमोल खताळ यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून संगमनेर शहराच्या विकासासाठी भरीव निधी आणणार असल्याचे व नगर विकास विभाग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीत असून त्यांचे संगमनेरवर विशेष प्रेम असल्यामुळे हे शक्य होणार असल्याचे प्रतिपादन केले.
महाराष्ट्र अग्निशमन सुरक्षा अभियानांतर्गत महायुती सरकारच्या माध्यमातून संगमनेर नगरपालिकेला मिळालेल्या नवीन मिनी रेस्क्यू अग्निशमन (गुरखा) वाहनाचा लोकार्पण सोहळा आमदार खताळ यांच्या हस्ते पार पडला. 
यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेवक ॲड. श्रीराम गणपुले, माजी नगरसेवक जावेद जाहागीरदार, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर कर्पे, शिवसेना तालुकाध्यक्ष रामभाऊ राहाणे, शहर अध्यक्ष विनोद सूर्यवंशी, आरपीआयचे (आठवले) शहराध्यक्ष कैलास कासार, रामभाऊ जाजू, शौकत जाहागीरदार, रोहित चौधरी, सौरभ देशमुख, विकास पुंड, विकास डमाळे, भाजपच्या शहराध्यक्ष पायल ताजने, माजी नगरसेविका अल्पना तांबे, मेघा भगत, कांचन ढोरे, मुख्याधिकारी रामदास कोकरे, कार्यालयीन अधीक्षक राजेश गुंजाळ, प्रशासन अधिकारी प्रल्हाद देवरे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार खताळ यांनी सांगितले की, संगमनेर शहरातील अरुंद रस्त्यांमुळे अपघातांच्या वेळी अशा वाहनांची गरज भासते. हे वाहन वेळेवर पोहोचून नागरिकांचे प्राण वाचवू शकेल, असे सांगत विकासकामांमध्ये येणाऱ्या अडथळ्यांकडे आणि अफवांकडे आपण दुर्लक्ष करत असल्याचे सांगितले. तसेच, केंद्रात, राज्यात व तालुक्यात महायुतीचे सरकार असल्याने कोणालाही त्रास होणार नाही, असे आश्वासन दिले. 
नगरपालिकेत येणाऱ्या सर्वसामान्य लोकांची कामे पदाधिकाऱ्यांच्या शिफारशीशिवाय झाली पाहिजेत, यासाठी नगरपालिका प्रशासनाने पुढाकार घ्यावा, असे निर्देश त्यांनी दिले. मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी अल्पावधीतच संपूर्ण शहरात शिस्तीचे वातावरण निर्माण केल्याचे कौतुक करत, अजूनही सत्ता असल्याच्या थाटात वागणाऱ्या काही माजी नगरसेवकांवर उपाययोजना करण्याचे सक्त निर्देशही आमदार खताळ यांनी दिले.
संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी नव्याने दाखल झालेल्या गुरखा अग्निशमन वाहनाचा उपयोग, त्याचे कार्यक्षेत्र आणि भविष्यातील बचावकार्यातील भूमिकेविषयी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यालयीन अधीक्षक राजेश गुंजाळ यांनी केले, तर आभार प्रशासन अधिकारी प्रल्हाद देवरे यांनी मानले.
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,331
अग्निशमन लोकार्पण अमोल खताळ रामदास कोकरे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज रविवार, २० सप्टेंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

By Annant Ppangarkar20/09/20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साह आणि नवीन ऊर्जा घेऊन आला आहे. कार्यक्षेत्रात…

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

19/09/2026

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.