Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीच्या कार्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा: गोशाळांना या सक्त सूचना
प्रशासन

प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीच्या कार्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा: गोशाळांना या सक्त सूचना

उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. उमेश पाटील यांनी जिल्ह्यामध्ये ५२ गोशाळा नोंदणीकृत असून, त्यापैकी ३२ गोशाळांना परिपोषण योजनेअंतर्गत आणि १९ गोशाळांना मूलभूत सुविधा उभारणीसाठी शासनाचे आर्थिक सहाय्य मिळाल्याची माहिती दिली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/06/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर, दि. २६: 

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीच्या आढावा बैठकीत समितीच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी भटक्या प्राण्यांच्या व्यवस्थापनावर आणि विशेषतः अवैध वाहतुकीतून जप्त केलेल्या पशुधनाला गोशाळांकडून प्रवेश नाकारल्याच्या तक्रारींवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

या बैठकीला उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे, नगरपालिका प्रशासनचे सहायक आयुक्त प्रशांत खांडकेकर आणि उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. उमेश पाटील यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी यावेळी गोशाळा संचालकांना सक्त निर्देश दिले. ते म्हणाले की, अनाथ किंवा अवैध वाहतुकीतून जप्त केलेल्या गायवर्गीय पशुधनाला गोशाळांमध्ये दाखल करून घेण्यास अनेकदा नकार दिला जातो. अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त होत असून, असे प्रकार निदर्शनास आल्यास संबंधित गोशाळांवर नियमानुसार तातडीने कारवाई करावी. याशिवाय, अशा गोशाळांना शासनाचे कोणतेही अनुदान मिळण्यासाठी शिफारस करू नये, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

पाळीव प्राण्यांच्या दुकानांची नोंदणी आणि शर्यतींवर बंदी… जिल्हाधिकाऱ्यांनी शहरी आणि ग्रामीण भागातील पाळीव प्राण्यांच्या आवश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्या सर्व दुकानांची तातडीने नोंदणी करण्याचे आदेश दिले. तसेच, नियमबाह्य आणि विनापरवाना आयोजित केल्या जाणाऱ्या बैलगाडा आणि घोड्यांच्या शर्यतींवर कठोर कारवाई करण्याची सूचना केली.

भटक्या प्राण्यांचे लसीकरण आणि व्यवस्थापन… शहरांमध्ये आढळणाऱ्या भटक्या पशुधनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावर त्यांनी भर दिला. पशुसंवर्धन विभागाने रेबीज प्रतिबंधक लसींचा पुरेसा साठा उपलब्ध करून स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील भटक्या प्राण्यांचे लसीकरण करून घ्यावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

या बैठकीत उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. उमेश पाटील यांनी जिल्ह्यामध्ये ५२ गोशाळा नोंदणीकृत असून, त्यापैकी ३२ गोशाळांना परिपोषण योजनेअंतर्गत आणि १९ गोशाळांना मूलभूत सुविधा उभारणीसाठी शासनाचे आर्थिक सहाय्य मिळाल्याची माहिती दिली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 941
गोशाळा पंकज आशिया बैठक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश; संगमनेर तालुक्यातील प्रलंबित पाणीपुरवठा योजना नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा: मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश… उपअभियंता सक्तीच्या रजेवर, तर योजनांचे होणार थर्ड पार्टी ऑडिट

07/10/2026

सहकाराची परंपरा जपण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत, संगमनेरात पार पडली बैठक; या नेत्यांची होती उपस्थिती

27/09/2026

५० लाखांची कथित खंडणी अन् प्रशासकीय अनागोंदी: मुख्याधिकारी सक्तीच्या रजेवर, जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई; नायब तहसीलदार मोहसीन शेख यांच्याकडे अतिरिक्त पदभार

24/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या बुधवारी…

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.