Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शुक्रवार ०९ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

09/10/2026

पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आर्टिका इर्टिका कारचा भीषण अपघात; एका युवतीचा जागीच मृत्यू, चार प्रवासी गंभीर

08/10/2026

संगमनेर आगारात ‘शिवाई’ इलेक्ट्रिक बसेस, आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते लोकार्पण; लोकार्पण कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना उपस्थितांकडून श्रद्धांजली

08/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गुणवंत विद्यार्थी आणि विवाहित महिलांचा सन्मान सोहळा: पद्मशाली समाज संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी जपणारा समाज- तन्मय जक्का
सामाजिक

गुणवंत विद्यार्थी आणि विवाहित महिलांचा सन्मान सोहळा: पद्मशाली समाज संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी जपणारा समाज- तन्मय जक्का

जितेंद्र कांचानी यांनी देखील समाजाच्या निस्वार्थ समाजसेवा आणि एकोप्याचे कौतुक केले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/06/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी: 

पद्मशाली समाज संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी जपणारा समाज असून त्याचा प्रत्येक समाज बांधवाला अभिमान आहे. येथील समाज बांधवांचे ऐक्य पाहून आनंद झाल्याचे प्रतिपादन ‘लय आवडतेस तू मला’ फेम अभिनेते तन्मय जक्का यांनी केले.

अभिनेते तन्मय जक्का आणि एसबीसी अन्याय निवारण कृती समितीचे राज्याचे अध्यक्ष, ओबीसी नेते जितेंद्र कांचानी यांच्या उपस्थितीत रविवारी (२२ जून) मालपाणी उत्सव हॉल येथे संगमनेरच्या पद्मशाली समाज मंडळाच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थी, शैक्षणिक व विविध स्पर्धांमध्ये नैपुण्य मिळवलेले विद्यार्थी, आणि संगमनेरच्या विवाहित महिलांचा (लाडक्या लेकी) गौरव सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या कार्यक्रमात शालेय साहित्याचे वाटपही करण्यात आले. यावेळी एसबीसी अन्याय निवारण कृती समितीचे राज्याचे अध्यक्ष, ओबीसी नेते जितेंद्र कांचानी उपस्थित होते.

या सोहळ्यात इयत्ता पहिली ते बारावी तसेच पदवी आणि पदव्युत्तर परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याव्यतिरिक्त, शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक, आणि राजकीय क्षेत्रांत विशेष नैपुण्य मिळवलेल्या समाज बांधवांचा आणि विवाहित ‘लाडक्या लेकीं’चाही सन्मान करण्यात आला.

तन्मय जक्का यांनी पद्मशाली समाजाचे ऐक्य पाहून आनंद व्यक्त केला आणि या उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या. जितेंद्र कांचानी यांनी देखील समाजाच्या निस्वार्थ समाजसेवा आणि एकोप्याचे कौतुक केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समाजाचे अध्यक्ष गणेश मादास यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच उपाध्यक्ष शांताराम आडेप आणि शिक्षक नेते हिरालाल पगडाल यांनी ‘लाडक्या लेकी’ हा उपक्रम सुरू केल्याबद्दल मंडळाचे कौतुक केले. यावेळी पापय्या सिरसुल्ला, चंद्रशेखर झुंजूर, चंद्रकांत एनगंदुल, अरविंद पगडाल, मधुकर वनम, दत्तात्रय इटप, सुनील मादास, नारायण इटप, महिला अध्यक्षा कविता सिरसुल्ला, युवक अध्यक्ष अंबादास आडेप यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे नियोजन आदर्श शिक्षक प्रकाश वनम सर आणि मीनाक्षी श्रीपतवाड यांनी समाजातील इतर शिक्षकांच्या मदतीने केले होते. पद्मशाली समाज मंडळ, महिला मंडळ आणि युवक संघटना यांच्या अथक परिश्रमामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला.

यावेळी नरेंद्र आडेप, दत्तात्रय पगडाल, रमेश वनम, राम चन्ना, अनिल अन्नलदास, प्रकाश वनम, राजू बुरा, शंकर गुंडेटी, अजय श्रीपतवाड, विनोद झुंजूर, विशाल एनगंदुल, श्रीकांत बिज्जा, एकनाथ श्रीपत, कल्पना एनगंदुल, अलका आडेप, यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 929
गणेश मादास पद्मशाली समाज
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026

‘संगमनेर फेस्टिव्हल’ हा संगमनेरकरांचा सांस्कृतिक मानबिंदू : मनीष मालपाणी १८ व्या संगमनेर फेस्टिव्हलचा सांगता सोहळा उत्साहात; विनोदी नाटकाने प्रेक्षकांना हसवले मनमुराद

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

शुक्रवार ०९ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar09/10/20260

आजचे राशीभविष्य- मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला रासेल. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची…

पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आर्टिका इर्टिका कारचा भीषण अपघात; एका युवतीचा जागीच मृत्यू, चार प्रवासी गंभीर

08/10/2026

संगमनेर आगारात ‘शिवाई’ इलेक्ट्रिक बसेस, आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते लोकार्पण; लोकार्पण कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना उपस्थितांकडून श्रद्धांजली

08/10/2026

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.