Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शुक्रवार, १८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे सर्व राशीचे राशी भविष्य

18/09/2026

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » खासगी कोचिंग क्लासेसमध्ये 17 वर्षीय विद्यार्थिनीचा लैंगिक छळ; दोन शिक्षक फरार
गुन्हेगारी

खासगी कोचिंग क्लासेसमध्ये 17 वर्षीय विद्यार्थिनीचा लैंगिक छळ; दोन शिक्षक फरार

पीडितेने आई-वडिलांसह शिवाजीनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली, त्यानंतर दोन्ही शिक्षकांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेनंतर दोघेही शिक्षक फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/06/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – 

‘नीट’ परीक्षेची तयारी करणाऱ्या एका 17 वर्षीय विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी दोन शिक्षकांविरुद्ध बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात ‘पोस्को’ (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

विजय पवार आणि प्रशांत खाटोकर अशी या दोन शिक्षकांची नावे असून, ते दोघे बीड शहरात खासगी कोचिंग क्लासेस चालवतात. विद्यार्थिनीच्या तक्रारीनुसार, प्रशांत खाटोकर (फिजिक्स शिकवणारे) हे तिला क्लास संपल्यावर केबिनमध्ये एकटे बोलावून तिचे चुंबन घ्यायचे आणि तिच्या छातीला व गुप्तांगाला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचे. इतकंच नाही, तर ते तिचे कपडे काढायला लावून फोटोही काढायचे. क्लासरूममध्ये कोणी नसतानाही ते तिच्यासोबत असेच गैरवर्तन करायचे. “जर तू कोणाला सांगितले, तर मी तुला मारून टाकेन,” अशी धमकीही त्यांनी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या छळाला कंटाळून पीडित मुलीने दुसरे शिक्षक, विजय पवार यांची मदत मागितली. मात्र, त्यांनी मदत करण्याऐवजी उलट “आम्हीच त्यांना मुलींना त्रास देण्यासाठी ठेवले आहे,” असे म्हणत स्वतःही तिच्यासोबत गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. तेही तिला केबिनमध्ये एकटे बोलावून तिच्यासोबत गैरवर्तन करायचे. यामुळे इतर विद्यार्थीही तिच्याकडे वाईट नजरेने पाहू लागले, यामुळे तिला खूप त्रास होत होता.

या प्रकाराबाबत तिने तिच्या मैत्रिणीला सांगितले असता, तिने “ते आपले सर आहेत, आपण त्यांचा आदर करायला हवा,” असे म्हणून या घटनेकडे दुर्लक्ष करायला सांगितले. मात्र, शिक्षकांकडून होणारा त्रास असह्य झाल्याने, अखेरीस तिने हा संपूर्ण प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला.

मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, तिने एप्रिल 2024 मध्ये उमा किरण कोचिंग क्लासेसमध्ये नीटच्या क्लासेससाठी प्रवेश घेतला होता. जुलै 2024 पासून प्रशांत खाटोकर सर अभ्यासिकेतून बाहेर पडताना तिचा पाठलाग करायचे आणि तिला गाडीवरून सोबत येण्यास सांगायचे.

पीडितेने आई-वडिलांसह शिवाजीनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली, त्यानंतर दोन्ही शिक्षकांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेनंतर दोघेही शिक्षक फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत आणि पुढील तपास करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,540
खासगी क्लासेस बीड बीड पोलीस विनयभंग
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

शुक्रवार, १८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे सर्व राशीचे राशी भविष्य

By Annant Ppangarkar18/09/20260

आजचे राशिभविष्य ​मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता…

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.