Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

19/09/2026

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ट्रक टर्मिनलचे राजकारण? आमदार खताळ यांच्यावर खोटी टीका झाल्याचा गुंजाळ मळा परिसरातील कार्यकर्त्यांचा आरोप
राजकारण

ट्रक टर्मिनलचे राजकारण? आमदार खताळ यांच्यावर खोटी टीका झाल्याचा गुंजाळ मळा परिसरातील कार्यकर्त्यांचा आरोप

गेल्या काही महिन्यांपासून कामाची गती अतिशय कमी आहे. याच कारणामुळे आमदार खताळ यांनी मुख्याधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांसोबत कामाची पाहणी केली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/06/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी: 

संगमनेरमधील गुंजाळ मळा परिसरात सुरू असलेल्या ट्रक टर्मिनलच्या कामावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. येथील स्थानिक कार्यकर्त्यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे आमदार अमोल खताळ यांच्यावर होत असलेली टीका खोटी आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप केला आहे.

संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी तालुक्यात सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी करण्याच्या उद्देशाने नुकतीच या ट्रक टर्मिनलला भेट दिली होती. पंचायत समितीजवळील या कामाची गती कमी असल्याने, त्यांनी अधिकारी आणि ठेकेदारांना कामाला गती देण्यासोबतच कामाचा दर्जा चांगला राखण्याच्या सूचना दिल्या. या भेटीदरम्यान त्यांनी कामाचे श्रेय घेण्याबद्दल कुठलेही वक्तव्य केले नाही, असे स्थानिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

आमदार खताळ हे तालुक्याच्या विकासकामांवर वेगाने लक्ष केंद्रित करत असल्याने एका विचलित झालेल्या नेत्याने आपल्या कार्यकर्त्यांना पुढे करून त्यांच्यावर खोटी टीका केल्याचा आरोप या पत्रकात करण्यात आला आहे. हे टीका करणारे कार्यकर्ते खताळ यांच्या पाहणी दौऱ्याच्या वेळी घटनास्थळी उपस्थित नव्हते, असा दावाही कार्यकर्त्यांनी केला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

केंद्र सरकारच्या निधीतून संगमनेर नगर परिषदेमार्फत सुमारे सहा कोटी रुपये खर्चून या ट्रक टर्मिनलचे काम सुरू आहे. मागील वर्षी या कामाला मंजुरी मिळाली होती, मात्र गेल्या काही महिन्यांपासून कामाची गती अतिशय कमी आहे. याच कारणामुळे आमदार खताळ यांनी मुख्याधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांसोबत कामाची पाहणी केली.

आमदारांवर टीका करणाऱ्या पत्रकात असा उल्लेख होता की, “ट्रक टर्मिनलचे काम कोणी केले, जमीन देण्यासाठी स्थानिकांची कशी मदत झाली, याबाबतची माहिती घ्या मग श्रेय घ्या.” यावर पलटवार करत स्थानिक कार्यकर्त्यांनी म्हटले आहे की, ही टीका म्हणजे अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, या टर्मिनलसाठी जागा देण्यामध्ये स्थानिक नागरिकांची सामूहिक भूमिका नव्हती, तर एकाच कुटुंबाने ही जागा दिली आहे.

ठेकेदार आणि कामाबद्दल संशय?

पत्रकात गंभीर आरोप करण्यात आले आहेत की, या कामाचा ठेकेदार वेगळा असून तो कामाकडे फिरकतही नाही. ज्या कुटुंबाने जागा दिली आहे, तेच प्रत्यक्षात हे काम करत आहेत. टीका करणाऱ्या नेत्याने आपल्या समर्थकांना हे काम दिले असून, केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या निधीवर त्यांचे लक्ष आहे, असा आरोपही कार्यकर्त्यांनी केला. शिवम गुंजाळ, अक्षय गुंजाळ आणि अभिजीत घाडगे यांच्या सह्या असलेले हे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 883
अमोल खताळ आरोप प्रत्यारोप ट्रक टर्मिनल
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

By Annant Ppangarkar19/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू असलेला…

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.