Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

11/10/2026

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर तालुक्यात दररोज तब्बल ‘इतक्या’ लाख दुधाचे उत्पादन; दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान: माजी मंत्री थोरात यांचे प्रतिपादन
शेती व सहकार

संगमनेर तालुक्यात दररोज तब्बल ‘इतक्या’ लाख दुधाचे उत्पादन; दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान: माजी मंत्री थोरात यांचे प्रतिपादन

विकासात दुग्ध व्यवसायाने ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा आधार दिला असून संगमनेर तालुक्यात दररोज सुमारे ९ लाख लिटर दुधाचे उत्पादन होते.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/06/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी: 

संगमनेर तालुका हा एकेकाळी दुष्काळी होता, पण आज तो आपल्या विकासकामांच्या जोरावर राज्यात ओळखला जातो. या विकासात दुग्ध व्यवसायाने ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा आधार दिला असून संगमनेर तालुक्यात दररोज सुमारे ९ लाख लिटर दुधाचे उत्पादन होते. या कष्टाच्या व्यवसायात महिलांचे योगदान मोलाचे आहे, असे गौरवोद्गार माजी कृषी व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले. 

आंबीखालसा येथील मुळेश्वर महिला सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या २५ व्या रौप्यमहोत्सव सोहळ्याप्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख होते. व्यासपीठावर थोरात कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग घुले, खांडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष लहानभाऊ गुंजाळ, मार्केट कमिटीचे सभापती शंकरराव खेमनर, माजी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, मारुती देवस्थानचे अध्यक्ष सर्जेराव ढमढेरे, तसेच मुळेश्वर संस्थेच्या चेअरमन अलका ढमढेरे आणि व्हाईस चेअरमन आरिफा शेख उपस्थित होत्या. याप्रसंगी सर्वाधिक दूध उत्पादन करणाऱ्या महिलांचा सत्कार थोरात यांच्या हस्ते करण्यात आला.

थोरात म्हणाले की, सहकारामुळे ग्रामीण भागात आर्थिक समृद्धी आली आहे. राजहंस दूध संघ हा सहकार क्षेत्रातील एक उत्कृष्ट संघ असून, त्यांच्या कार्यामुळेच खासगी दूध संघ शेतकऱ्यांना चांगला भाव देत आहेत. 

राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने शेतकरी आणि दूध उत्पादकांच्या जीवनात आनंद निर्माण केल्याचे सांगितले. दूध संघाने सातत्याने मुरघास आणि एमडीएफ गोठा यांसारख्या नवनवीन योजना राबवल्या असून, या संकल्पना आज राज्यभर मॉडेल म्हणून ओळखल्या जात आहेत. त्यांनी सर्व संस्थांना गुणवत्तापूर्ण दूध उत्पादन करून सहकाराची ही परंपरा जपण्याचे आवाहन केले.

तर सहकारी संस्थांमुळेच संगमनेर तालुक्याचा सहकार पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झाला, ही तालुक्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे अजय फटांगरे यांनी नमूद केले.

 

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 938
आंबी खालसा बाळासाहेब थोरात रणजीतसिंह देशमुख
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

11/10/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026

एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला; संगमनेरमधून या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

08/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

By Annant Ppangarkar11/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यात विविध ठिकाणांहून देवीच्या पायी ज्योती आणण्याची धार्मिक…

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

रविवार ११ ऑक्टोबर २०२६ — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

11/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.