Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

19/09/2026

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » भूमिगत गटार व सर्व्हिस रोडच्या कामाचा शुभारंभ: भ्रष्ट ठेकेदारांवर कारवाई करा, आमदार खताळ यांचे मुख्याधिकाऱ्यांना आदेश
राजकारण

भूमिगत गटार व सर्व्हिस रोडच्या कामाचा शुभारंभ: भ्रष्ट ठेकेदारांवर कारवाई करा, आमदार खताळ यांचे मुख्याधिकाऱ्यांना आदेश

काही लोक शहरात एसटीपी प्लांट उभारण्याचा प्रयत्न करत आहेत; मात्र तो प्लांट शहराबाहेर हलवण्यासाठी आपण नागरिकांच्या सोबत राहू, असे त्यांनी सांगितले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/06/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी: 

संगमनेर नगरपालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून कचरा व्यवस्थापन, गटार स्वच्छता आणि रस्ते दुरुस्तीची कामे करणाऱ्या ठेकेदारांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे सक्त आदेश आमदार अमोल खताळ यांनी मुख्याधिकारी रामदास कोकरे यांना दिले आहेत.

दिल्ली नाका येथील नागरी दलितोत्तर वस्ती सुधार योजनेअंतर्गत भूमिगत गटार काँक्रिटीकरण आणि सर्व्हिस रोड तयार करण्याच्या कामाचा शुभारंभ रविवारी सकाळी आमदार खताळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

आमदार खताळ म्हणाले, गेल्या ३० वर्षांपासून शहरावर ज्यांची सत्ता होती, त्यांनी गटारी आणि रस्त्यांच्या कामाचे ठेके त्यांच्याच ठेकेदारांना दिले. मोर्चा काढायलाही तेच ठेकेदार पुढे होते. त्यांच्या कार्यकाळात नगरपालिकेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. या भ्रष्टाचाराची माहिती माझ्या कार्यालयात द्या. या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी लवकरच उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेऊन दोषींवर कारवाई करण्यास भाग पाडू.

दिल्ली नाका परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी सर्व्हिस रोडची गरज असल्याचे आपण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे मांडले होते. त्यांनी तात्काळ नागरी दलितोत्तर वस्ती सुधार योजनेतून १ कोटी ५१ लाख ६९ हजार रुपयांचा निधी मंजूर केला, यामुळे या कामाची सुरुवात झाली आहे.

आमदार खताळ यांनी “न खाऊंगा, ना खाने दूंगा” या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेचा पुनरुच्चार करत, ठेकेदारांना काम वेळेत आणि चांगल्या दर्जाचे करण्याचे निर्देश दिले. कामाचा दर्जा उत्तम राहील याची खात्री प्रशासनाने करावी, असेही ते म्हणाले. केंद्रात आणि राज्यात महायुतीचे सरकार असल्याने विकास कामांसाठी निधीची कमतरता नाही. त्यामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीत विकासाला प्राधान्य देणाऱ्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.

या वेळी आमदार खताळ यांनी एसटीपी प्लांटच्या (सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प) मुद्द्यावरही आपली भूमिका स्पष्ट केली. काही लोक शहरात एसटीपी प्लांट उभारण्याचा प्रयत्न करत आहेत; मात्र तो प्लांट शहराबाहेर हलवण्यासाठी आपण नागरिकांच्या सोबत राहू, असे त्यांनी सांगितले. 

या कार्यक्रमाला माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागीरदार, माजी नगरसेवक शिरीष मुळे, माजी नगरसेवक ॲड. श्रीराम गणपुले, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर कर्पे, शिवसेनेचे शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी तालुका प्रमुख रामभाऊ राहणे, आरपीआयचे (आठवले) शहराध्यक्ष कैलास कासार, भाजपचे दादा गुंजाळ, रोहित चौधरी, वरद बागुल, ऋषिकेश मुळे, सौरभ देशमुख, राहुल भोईर, गोकुळ दिघे, नासिर शेख, बबलू काझी, मजहर शेख, मुझफ्फर जहागीरदार, कांचन ढोरे, मेघा भगत, रेश्मा खांडरे उषा कपिले, मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित जाधव यांनी केले. संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी प्रास्ताविक केले, तर नगर अभियंता प्रशांत जुन्नरे यांनी आभार मानले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,287
अमोल खताळ भूमिगत गटार रामदास कोकरे सर्विस रोड
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

By Annant Ppangarkar19/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू असलेला…

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.