Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज रविवार, २० सप्टेंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

20/09/2026

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

19/09/2026

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून नॅशनल यंग ग्राउंडसाठी १ कोटींचा निधी, पण काम कोणी थांबवले? – जावेद शेख
राजकारण

आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून नॅशनल यंग ग्राउंडसाठी १ कोटींचा निधी, पण काम कोणी थांबवले? – जावेद शेख

केंद्रात आणि राज्यात भाजपप्रणित सरकार असतानाही नगरपालिकेला स्वच्छतेसाठी अनेक पुरस्कार मिळाले, तसेच १० कोटी रुपयांची बक्षिसेही मिळाली आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/06/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी: 

संगमनेर शहर आणि तालुका हा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली नेहमीच एकसंध परिवार म्हणून राहिला आहे, मात्र काही लोक राजकारणासाठी समाजात तेढ निर्माण करत आहेत, असा आरोप करत आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून यंग नॅशनल ग्राउंडच्या विकासासाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता आणि कामाला सुरुवातही झाली होती. मात्र, हे काम कोणी थांबवले, हे सर्वांना माहीत आहे, असे अल्पसंख्यांक काँग्रेसचे अध्यक्ष जावेद शेख यांनी म्हटले आहे.

जावेद शेख यांनी प्रसिद्धी पत्रकातून सांगितले की, बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली या विभागात विकासाच्या अनेक योजना राबवण्यात आल्या. एसटीपी प्लांटच्या जागेचा वाद असो किंवा इतर विकासकामे, नेतृत्वाने नेहमीच सर्व जनतेला आपले मानून काम केले आहे. मात्र, काही लोक जाणीवपूर्वक गैरसमज आणि अफवा पसरवून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत.

‘महायुती सरकारने केवळ राजकारणासाठी काम थांबवले’

नॅशनल यंग ग्राउंड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी आहे. या ग्राउंडच्या विकासासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी पाठपुरावा करून १ कोटी रुपयांचा निधी मिळवला आणि कामाला सुरुवातही झाली. परंतु, राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर केवळ राजकारणासाठी हे काम थांबवण्यात आले, असा थेट आरोप शेख यांनी केला. सर्व तरुणांना हे चांगलेच माहीत आहे, त्यामुळे कोणीही भूलथापा देऊन जनतेची दिशाभूल करू नये. नवीन लोकप्रतिनिधींनी नवीन निधी आणून विकासकामे करावीत, असे आवाहनही त्यांनी केले.

‘स्वच्छतेच्या लौकिकाला धक्का’

स्वच्छता आणि विकासकामांसाठी संगमनेर नगरपालिकेने राज्यात लौकिक मिळवला आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपप्रणित सरकार असतानाही नगरपालिकेला स्वच्छतेसाठी अनेक पुरस्कार मिळाले, तसेच १० कोटी रुपयांची बक्षिसेही मिळाली आहेत. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून महायुतीतील सत्ताधाऱ्यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन काम करत असताना, शहरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता वाढली आहे. यामुळे स्वच्छ आणि सुंदर शहराचा लौकिक कमी होत असून नागरिक त्रस्त झाले आहेत. जागोजागी कचऱ्याचे ढिग साचले आहेत, डासांचे प्रमाण वाढले आहे आणि घंटागाडी वेळेवर येत नाही.

या गंभीर परिस्थितीवर राजकारण करणे दुर्दैवी आहे. विद्यमान लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला तातडीने सूचना देऊन स्वच्छता करावी, अशी मागणी विविध प्रभागांतील नागरिकांनी केली आहे. संगमनेरचा लौकिक चांगल्या कामांमुळे आहे, त्यामुळे राजकारणासाठी चुकीचे आरोप करून जनतेच्या मनात गैरसमज निर्माण करू नये, असेही जावेद शेख यांनी शेवटी म्हटले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,012
जावेद शेख यंग नॅशनल ग्राउंड सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज रविवार, २० सप्टेंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

By Annant Ppangarkar20/09/20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साह आणि नवीन ऊर्जा घेऊन आला आहे. कार्यक्षेत्रात…

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

19/09/2026

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.