Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नाने संगमनेरच्या शेतकऱ्यांना युरिया उपलब्ध
शेती व सहकार

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नाने संगमनेरच्या शेतकऱ्यांना युरिया उपलब्ध

थोरात यांनी प्रशासनाकडे आणि सरकारकडे राज्यातील तसेच संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना बफर स्टॉक मधून 50% युरिया उपलब्ध करून देण्याबाबत पत्र दिले होते. त्यांच्या या मागणीचा विचार करून, कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी युरिया उपलब्ध करून दिला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी-

खरीप हंगामाच्या सुरुवातीला संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली असली तरी, युरियाच्या तुटवड्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली होती. शेतकऱ्यांची ही समस्या लक्षात घेत राज्याचे माजी कृषी मंत्री आणि काँग्रेस राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी तातडीने प्रशासनाकडे धाव घेतली. त्यांच्या सूचनेनुसार, कृषी विभागाने सोमवारी शेतकऱ्यांसाठी युरिया उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार प्रशासनाला बफर स्टॉक मधील 50% युरिया तात्काळ उपलब्ध करून देण्यास सांगितले होते. शेतकरी हा देशाचा पोशिंदा असून त्याला सरकारने सातत्याने मदत करावी, अशी भूमिका थोरात यांनी नेहमीच मांडली आहे.

थोरात यांनी शेतकऱ्यांच्या अडचणींवर प्रकाश टाकत म्हटले की, शेतकऱ्यांना आसमानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटांना सामोरे जावे लागत आहे. अनेकदा चांगले पीक येऊनही योग्य भाव मिळत नाही. शासनाने अनेकदा हमीभाव जाहीर करण्याचे आश्वासन दिले असले तरी, त्याची अंमलबजावणी झालेली नाही. या परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांना मदत करणे आवश्यक आहे, अशी त्यांची ठाम भूमिका आहे. याचबरोबर, महायुती सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची घोषणा केली होती, ती तातडीने करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

थोरात यांनी प्रशासनाकडे आणि सरकारकडे राज्यातील तसेच संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना बफर स्टॉक मधून 50% युरिया उपलब्ध करून देण्याबाबत पत्र दिले होते. त्यांच्या या मागणीचा विचार करून, कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी युरिया उपलब्ध करून दिला आहे. थोरात यांच्या या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे.

बाळासाहेब थोरात: एक यशस्वी कृषी मंत्री – महाराष्ट्राचे सर्वात यशस्वी कृषी मंत्री म्हणून बाळासाहेब थोरात यांची ओळख आहे. त्यांनी सहा वर्षांच्या कार्यकाळात महापिक अभियान, 1 लाख शेततळी, विद्यापीठे बांधावर यांसारखे अनेक अभिनव उपक्रम राबवले. कृषी क्षेत्रात केलेल्या या ऐतिहासिक कार्यामुळे ते महाराष्ट्रभर लोकप्रिय कृषी मंत्री म्हणून ओळखले जातात. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतची विनअट कर्जमाफी देण्यासाठी थोरात यांचा सर्वाधिक पुढाकार होता, असे खांडगाव येथील प्रगतशील शेतकरी रमेश गुंजाळ यांनी सांगितले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 815
खते बाळासाहेब थोरात युरिया
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026

एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला; संगमनेरमधून या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

08/10/2026

तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांचा एक फोन आणि सोयाबीनला ४ हजार रुपयांची मदत; दुष्काळात शेतकऱ्यांना जाणवू लागली अनुभवी नेतृत्वाची उणीव

07/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

By Annant Ppangarkar10/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- भौगोलिकदृष्ट्या विस्ताराने मोठ्या असलेल्या संगमनेर तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांचे जाळे अधिक भक्कम…

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.