Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अल्पवयीन मुलीवर अत्याचार, फोटो व्हायरल करण्याची धमकी देत जबरदस्ती; गुन्हा दाखल
गुन्हेगारी

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, फोटो व्हायरल करण्याची धमकी देत जबरदस्ती; गुन्हा दाखल

सोमवारी पहाटे नातेवाईकांसह तोफखाना पोलीस ठाण्यात येऊन तिने फिर्याद दाखल केली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

 

अहिल्यानगर: 

प्रेमाचे नाटक करत, अल्पवयीन मुलीचे (वय १७) फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर दोन वेळा लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलीने सोमवारी (३० जून) पहाटे तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, कर्जत येथील एका अल्पवयीन मुलावर अत्याचार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामखेड तालुक्यातील रहिवासी असलेली पीडित मुलगी कर्जत येथील महाविद्यालयात शिकत असताना, डिसेंबर २०२४ मध्ये तिची व्हॉट्सअ‍ॅपवरून संशयित आरोपीशी ओळख झाली. जानेवारी २०२५ मध्ये त्यांची कर्जत येथील कॅफेमध्ये पहिली भेट झाली. यानंतर मुलाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला नकार दिल्यानंतर, पीडिता ‘नीट’ परीक्षेच्या तयारीसाठी अहिल्यानगर येथे आली. याच दरम्यान मुलाने तिला भेटून तिच्यासोबत फोटो काढले.

पुढे जेव्हा पीडितेने त्याच्याशी बोलणे थांबवले, तेव्हा मुलाने तिचे फोटो वडिलांना दाखवण्याची धमकी दिली. या धमक्यांना घाबरून तिने पुन्हा त्याच्याशी बोलण्यास सुरुवात केली. ६ एप्रिल २०२५ रोजी मुलाने तिला दिल्लीगेट, अहिल्यानगर येथून दुचाकीवरून अहिल्यानगर तालुक्यातील एका हॉटेलमध्ये नेले. तिथे तिने विरोध दर्शवूनही, फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मुलाने तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला.

या घटनेमुळे घाबरलेल्या पीडितेने भूम (जि. धाराशिव) तालुक्यातील तिच्या मामाच्या गावी आश्रय घेतला. मात्र, १६ मे २०२५ रोजी संशयित मुलगा तिथेही पोहोचला आणि पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर मुलाने तिच्या चुलत भावांना फोन करून ‘तुमच्या बहिणीचे आणि माझे प्रेमसंबंध आहेत, मी तिचे फोटो व्हायरल करेन,’ अशी धमकी दिली.

या सर्व प्रकारानंतर पीडित मुलीने तिच्या आई-वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. सोमवारी पहाटे नातेवाईकांसह तोफखाना पोलीस ठाण्यात येऊन तिने फिर्याद दाखल केली. पोलिसांनी संशयित अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला असून, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,008
अत्याचार अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

By Annant Ppangarkar18/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर शहरातील बहुचर्चित आणि वादग्रस्त ठरलेल्या एमडी ड्रग प्रकरणाला आता…

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.