Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ठाकरे गटाच्या महानगरप्रमुख समर्थकांवर गुन्हा दाखल; घरात घुसून तोडफोड आणि जीवे मारण्याची धमकी
गुन्हेगारी

ठाकरे गटाच्या महानगरप्रमुख समर्थकांवर गुन्हा दाखल; घरात घुसून तोडफोड आणि जीवे मारण्याची धमकी

या प्रकरणी सागर देशमुख, मामा राजवाडे, अमोल पाटील, लखन दोंदे, लखन झुरडया, विलास सनसे आणि त्यांचे वीस साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज:

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नवनियुक्त नाशिक महानगरप्रमुख सुनील बागुल यांचे खंदे समर्थक मामा राजवाडे यांच्यासह अन्य काही जणांवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरात घुसून तोडफोड करणे, मारहाण करणे, चोरी करणे आणि जीवे मारण्याची धमकी देणे असे आरोप त्यांच्यावर आहेत. या घटनेमुळे नाशिकच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरएसएस समर्थक आणि सराफ व्यावसायिक किशोर उर्फ गजू घोडके यांनी ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल यांच्या गैरव्यवहाराचे आरोप करणारे व्हिडिओ २७ जून रोजी फेसबुकवर अपलोड केले होते. बागुल यांनी समाजसेवेच्या नावाखाली पैशांचा गैरव्यवहार करत कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमवल्याचा आरोप घोडके यांनी या व्हिडिओतून केला होता आणि ईडी चौकशीची मागणी केली होती.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, बागुल यांचे समर्थक बाळा पाठक यांनी घोडके यांना व्हिडिओ डिलीट करण्यास सांगितले. त्यानंतर, मामा राजवाडे आणि सागर देशमुख यांनी फोन करून व्हिडिओ हटवण्यासाठी दबाव आणला. ३० जून रोजी संशयित आरोपींनी घोडके यांच्या काठेगल्ली येथील घरात घुसून त्यांना हत्यार आणि विटांनी मारहाण केली.

घरातील लोकांनी आरडाओरड केल्यावर राजवाडे यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच, घराची तोडफोड करून ४ लाख रुपयांचे नुकसान केले. याशिवाय, घोडके यांच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि घरातून १ लाख रुपये चोरून नेल्याची फिर्याद त्यांनी भद्रकाली पोलिसांत दिली आहे.

या प्रकरणी सागर देशमुख, मामा राजवाडे, अमोल पाटील, लखन दोंदे, लखन झुरडया, विलास सनसे आणि त्यांचे वीस साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला असून, या घटनेमुळे नाशिकमधील राजकीय वातावरण तापले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 494
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

By Annant Ppangarkar18/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर शहरातील बहुचर्चित आणि वादग्रस्त ठरलेल्या एमडी ड्रग प्रकरणाला आता…

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.