Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये चार महसूल कर्मचारी निलंबित, तत्कालीन तहसीलदारांवर चौकशीची टांगती तलवार; ॲड. शेख यांनी केली होती कारवाईची मागणी
प्रशासन

संगमनेरमध्ये चार महसूल कर्मचारी निलंबित, तत्कालीन तहसीलदारांवर चौकशीची टांगती तलवार; ॲड. शेख यांनी केली होती कारवाईची मागणी

दरम्यान संगमनेरमधील कायदेतज्ञ ॲड. सैफुद्दीन शेख यांनी देखील शिर्डीच्या अपर जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठांकडे संबंधितांनी जमिनीचे बेकायदेशीर तुकडे नोंदविल्या प्रकरणी चौकशी होऊन कारवाई करण्यासंदर्भात जानेवारीमध्ये तक्रार केली होती.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/07/2025Updated:02/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
अहिल्यानगर: 
बिगरशेती (Non-Agriculture – NA) कायद्यातील सुधारणा नियमांचे उल्लंघन करत, सातबारा उताऱ्यांमध्ये विनापरवाना फेरफार केल्याप्रकरणी अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांनी संगमनेरमधील चार महसूल कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. या गंभीर प्रकरणात तत्कालीन तहसीलदारांचीही चौकशी करण्याची शिफारस विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ही माहिती मिळाली असून, यामुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
जवळपास वर्षभरापूर्वीचे हे प्रकरण असून, या प्रकरणी तत्कालीन ग्राम महसूल अधिकारी भीमराज शांताराम काकड, मंडलाधिकारी वैशाली अंबादास मोरे, तलाठी पोमल दत्तात्रय तोरणे, आणि महसूल सहायक वसंत निवृत्ती वाघ या चौघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?- संगमनेर नगरपालिका हद्दीतील तसेच गावठाणातील जागांशी संबंधित हे प्रकरण आहे. ४२ ब, ४२ क, आणि ४२ ड अन्वये आकृषक आकारणी परवानगी (NA order) पूर्ण क्षेत्रासाठी असतानाही, महसूल कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र नगररचना अधिनियम १९६६ मधील तरतुदींचे उल्लंघन केले. सक्षम नियोजन प्राधिकरणाची मंजुरी नसताना, तसेच भूमी अभिलेख विभागाच्या उपअधीक्षकांकडून कमी-जास्त पत्रके (measurement sheets) प्राप्त झालेली नसतानाही, या कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीरपणे फेरफार घेतले आणि मंडळ अधिकाऱ्यांनी ते प्रमाणित केले. यामुळे मोठ्या प्रमाणावर कायदेशीर गुंतागुंत निर्माण झाली आहे.
विभागीय आयुक्तांकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार, हे प्रकरण अत्यंत गंभीर असून, दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून विभागीय चौकशी करणे क्रमप्राप्त झाले होते. जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे की, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम ८५ (२) मधील तरतुदींचा आणि महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम १९४७ या कायद्याचा भंग करण्यात आला आहे. याशिवाय, महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियमांचेही उल्लंघन झाल्याने ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईमुळे महसूल विभागातील अनियमितता समोर आली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेत मिळत आहेत. तत्कालीन तहसीलदारांच्या चौकशीचा निर्णयातून आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

दरम्यान संगमनेरमधील कायदेतज्ञ ॲड. सैफुद्दीन शेख यांनी देखील शिर्डीच्या अपर जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठांकडे संबंधितांनी जमिनीचे बेकायदेशीर तुकडे नोंदविल्या प्रकरणी चौकशी होऊन कारवाई करण्यासंदर्भात जानेवारीमध्ये तक्रार केली होती.  याशिवाय तालुक्यातील एका व्यक्तीने आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. या उपोषणाची दखल घेत व शेख यांच्या तक्रारीवरून संबंधितांची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 3,630
चौकशी निलंबन संगमनेर तहसील
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

५० लाखांची कथित खंडणी अन् प्रशासकीय अनागोंदी: मुख्याधिकारी सक्तीच्या रजेवर, जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई; नायब तहसीलदार मोहसीन शेख यांच्याकडे अतिरिक्त पदभार

24/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची संगमनेरमध्ये कारवाई: २.६० लाखांचे संशयास्पद ‘काऊ घी’ जप्त, तर भेसळप्रकरणी दुग्ध केंद्राचा परवाना निलंबित

22/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या बुधवारी…

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.