Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरच्या कत्तलखान्यांबाबत दिशाभूल करणारी माहिती देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार अमोल खताळ यांची अधिवेशनात मागणी
राजकारण

संगमनेरच्या कत्तलखान्यांबाबत दिशाभूल करणारी माहिती देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार अमोल खताळ यांची अधिवेशनात मागणी

संगमनेरची तरुण पिढी नासविण्याचे हे षडयंत्र असल्याची शंका व्यक्त करत या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही आमदार खताळ यांनी केली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी: 

संगमनेर शहरातील अवैध कत्तलखान्यांबाबत शासनाला खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती दिल्याप्रकरणी संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) आणि शहर पोलीस निरीक्षक (PI) यांच्यावर कारवाई करून त्यांना निलंबित करण्याची जोरदार मागणी आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे केली. 

संगमनेरमधील कत्तलखान्यासंदर्भात खताळ यांनी सभागृहात मंगळवारी प्रश्न उपस्थित केला होता त्यावर राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. फडणवीस यांच्या उत्तरानंतर पोलिसांनी सभागृहाला खोटी माहिती पुरविल्याचे खताळ यांनी बुधवारी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

आमदार खताळ यांनी सभागृहात सांगितले की, संगमनेर शहरात सर्रासपणे अवैध कत्तलखाने सुरू आहेत. मात्र, शहर पोलीस त्यांच्यावर केवळ थातुरमातुर कारवाई करत आहेत. गोवंश हत्याबंदी कायद्यातील तरतुदींमधून पळवाट काढून कत्तलखाना चालक-मालकांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

महत्त्वाची बाब म्हणजे, संगमनेर पोलिसांनी आतापर्यंत गोवंश हत्या आणि कत्तलखान्यांच्या प्रकरणात एकाही कत्तलखाना चालक-मालकावर महाराष्ट्र प्रतिबंधक अधिनियम (MPDA) अंतर्गत कारवाई केलेली नाही. असे असतानाही, संगमनेरच्या पोलीस अधिकाऱ्यांनी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना तशी कारवाई केल्याची खोटी माहिती देऊन शासनाची दिशाभूल केली आहे, असे आमदार खताळ यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे या दोन्ही अधिकाऱ्यांवर कारवाई करत त्यांचे निलंबन करावे, तसेच या माहितीची खातरजमा न करणारे अहमदनगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनाही सक्त ताकीद देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली.

याव्यतिरिक्त, आमदार खताळ यांनी संगमनेर शहरातील इतर अवैध धंद्यांकडेही सभागृहाचे लक्ष वेधले. महाविद्यालये, रुग्णालये, धार्मिक स्थळे आणि झोपडपट्टी परिसरात अवैध गुटखा, मादक पदार्थ, नशेच्या गोळ्या, सिगारेट, तसेच अफू, गांजा यांची पानटपरींवर खुलेआम विक्री होत असल्याचे त्यांनी सांगितले. मटका आणि ऑनलाईन जुगाराकडे बेरोजगार तरुणांच्या रांगा लागत आहेत. मोठ्या प्रमाणावर अवैध गावठी दारूची निर्मिती, वाहतूक आणि विक्री राजरोसपणे सुरू आहे, संगमनेरची तरुण पिढी नासविण्याचे हे षडयंत्र असल्याची शंका व्यक्त करत या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही आमदार खताळ यांनी केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,847
अमोल खताळ कत्तलखाने देवेंद्र फडणवीस पावसाळी अधिवेशन पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सांत्वन

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जवळेकडलग येथील अकरा वर्षीय बालक कृष्णा वसंत पवार याचा…

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.