Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » २५ वर्षीय तरुणीवर घरात घुसून कुरिअर बॉयकडून बलात्कार करत मोबाईल मध्ये सेल्फी काढत लिहिला असा धक्कादायक मेसेज, तर दुसऱ्या घटनेत तरुणीचा विनयभंग
गुन्हेगारी

२५ वर्षीय तरुणीवर घरात घुसून कुरिअर बॉयकडून बलात्कार करत मोबाईल मध्ये सेल्फी काढत लिहिला असा धक्कादायक मेसेज, तर दुसऱ्या घटनेत तरुणीचा विनयभंग

या दोन्ही घटनांनी पुणे शहरातील महिलांच्या सुरक्षिततेबद्दल गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असून, प्रशासनाने यावर तातडीने कठोर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – 

महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, दोन धक्कादायक घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुण्याच्या कोंढवा येथे कुरिअर डिलिव्हरीच्या नावाखाली घरात घुसून एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे, तर दुसरीकडे इन्फोसिसच्या हिंजवडी कॅम्पसमध्ये एका महिला कर्मचाऱ्याचा शौचालयात व्हिडिओ काढल्याचा प्रकार समोर आला आहे.

पुण्यातील कोंढवा येथील एका उच्चभ्रू गृहसंकुलात बुधवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास एक भयावह घटना घडली. एका २५ वर्षीय तरुणी घरात एकटी असताना, आरोपी कुरिअर देण्याच्या बहाण्याने तिच्या घरी आला. “माझे कुरिअर नाही” असे तरुणीने सांगितल्यावरही, “सही करणे आवश्यक आहे” असे सांगत आरोपीने तिला दरवाजा उघडण्यास भाग पाडले. सेफ्टी डोअर उघडताच, आरोपीने तिच्या चेहऱ्यावर स्प्रे मारून तिला बेशुद्ध केले आणि तिच्यावर बलात्कार केला.

या घटनेची भीषणता इथेच थांबली नाही. बलात्कारानंतर आरोपीने पीडितेचा मोबाईल घेऊन त्यात स्वतःचा एक सेल्फी काढला. त्यानंतर त्याने “मी पुन्हा येईन” असा धमकीवजा संदेश टाईप करून मोबाईलमध्येच ठेवला, ज्यामुळे पीडितेच्या मनात आणखी भीती निर्माण झाली आहे. कोंढवा पोलिसांनी याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याचा शोध सुरू आहे.

इन्फोसिस कॅम्पसमध्ये महिला कर्मचाऱ्याचा शौचालयात व्हिडिओ काढला – दुसरीकडे, प्रसिद्ध आयटी कंपनी इन्फोसिसच्या इलेक्ट्रॉनिक सिटी कॅम्पसमधील एका महिला कर्मचाऱ्याचा शौचालयात व्हिडिओ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ३० जून रोजी घडलेल्या या घटनेत, आपले व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जात असल्याचे उघडकीस आल्यावर महिलेने तातडीने अलार्म वाजवला. कंपनीचे कर्मचारी धावले आणि त्यांनी आरोपीला पकडले. आरोपीच्या मोबाईलमध्ये वेगवेगळ्या महिलांचे ३० हून अधिक अश्लील व्हिडिओ आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

या दोन्ही घटनांनी पुणे शहरातील महिलांच्या सुरक्षिततेबद्दल गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असून, प्रशासनाने यावर तातडीने कठोर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,505
अत्याचार गुन्हेगारी विनयभंग
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

By Annant Ppangarkar18/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर शहरातील बहुचर्चित आणि वादग्रस्त ठरलेल्या एमडी ड्रग प्रकरणाला आता…

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.