Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अजय फटांगरे संगमनेर तालुका काँग्रेसचे नवे अध्यक्ष; कोपरगाव आणि भिंगारलाही नवे प्रमुख मिळाले
राजकारण

अजय फटांगरे संगमनेर तालुका काँग्रेसचे नवे अध्यक्ष; कोपरगाव आणि भिंगारलाही नवे प्रमुख मिळाले

प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली २६ जून २०२५ रोजी झालेल्या काँग्रेस कमिटीच्या बैठकीत त्यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी: 

काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका कायम काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. याच परंपरेला पुढे नेत, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अजय नारायण फटांगरे यांची संगमनेर तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्यासोबतच कोपरगाव ग्रामीणच्या तालुकाध्यक्षपदी नितीनराव मनोहर शिंदे आणि भिंगारच्या तालुकाध्यक्षपदी रिजवान शेख यांचीही निवड झाली आहे.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अजय फटांगरे यांनी यापूर्वी संगमनेर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्षपद यशस्वीपणे सांभाळले होते. त्यावेळी त्यांनी तालुक्यात युवकांचे मोठे संघटन उभारले होते. तसेच, बोटा गटातून जिल्हा परिषदेचे उमेदवार म्हणून विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्यानंतर, त्यांनी थोरात यांच्या नेतृत्वाखाली कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापतीपदही भूषवले आहे.

बोटा गटात त्यांनी सातत्याने विविध विकास योजना राबवून लोकांमध्ये आपला जनसंपर्क कायम ठेवला आहे. त्यांच्या याच कामाची दखल घेऊन संगमनेर तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. 

प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली २६ जून २०२५ रोजी झालेल्या काँग्रेस कमिटीच्या बैठकीत त्यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले. याच बैठकीत नितीन मनोहर शिंदे आणि रिजवान शेख यांच्या निवडीचीही घोषणा करण्यात आली.

या निवडीबद्दल माजी मंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, दुर्गाताई तांबे, युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात, बाजीराव खेमनर, माधवराव कानवडे, रणजितसिंह देशमुख, इंद्रजीत थोरात, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी, शंकरराव खेमनर, रामहरी कातोरे, हौशीराम सोनवणे, पांडुरंग घुले, बाबा ओहोळ, मावळते अध्यक्ष मिलिंद कानवडे, सोमेश्वर दिवटे, विश्वासराव मुर्तडक, निखिल पापडेजा, अर्चना बालोडे, प्रमिला अभंग, प्रदेश सचिव सचिन गुंजाळ, गौरव डोंगरे, हैदर अली, जावेद शेख यांच्यासह संगमनेर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी आणि काँग्रेसच्या विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.

नवनियुक्त अध्यक्ष अजय फटांगरे यांनी या निवडीनंतर आपली भावना व्यक्त केली. ते म्हणाले, “माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माझ्यावर नेहमीच विश्वास ठेवला असून, मला एक मोठी संधी दिली आहे. मी अत्यंत प्रामाणिकपणे ही जबाबदारी पार पाडणार आहे. काँग्रेस हा राज्यघटना आणि देशहिताचा विचार आहे. युवक या विचारापासून काहीसे दुरावले असून, त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणून काँग्रेसला अधिक बळकट करण्यासाठी यापुढील काळात थोरात यांच्या नेतृत्वाखाली अधिक सक्रियतेने आणि जोमाने काम करून तालुका व जिल्ह्यात काँग्रेस पक्ष पुन्हा प्रथम क्रमांकावर नेऊ.” त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे आभारही मानले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,066
अजय फटांगरे निवड बाळासाहेब थोरात सत्यजित तांबे हर्षवर्धन सपकाळ
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026

काळाची गरज ओळखून धाडसी दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणे आपली सामूहिक जबाबदारी; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

17/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

By Annant Ppangarkar18/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर शहरातील बहुचर्चित आणि वादग्रस्त ठरलेल्या एमडी ड्रग प्रकरणाला आता…

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.