Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » स्थानिक पोलिसांचे पितळ उघडे… संगमनेरमध्ये जुगार अड्ड्यावर एलसीबीचा छापा, १४ जण ताब्यात; ११ लाख २४ हजाराचा मुद्देमाल जप्त
गुन्हेगारी

स्थानिक पोलिसांचे पितळ उघडे… संगमनेरमध्ये जुगार अड्ड्यावर एलसीबीचा छापा, १४ जण ताब्यात; ११ लाख २४ हजाराचा मुद्देमाल जप्त

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडून जुगार खेळण्यासाठी लागणारे साहित्य, रोख रक्कम, १३ मोबाईल फोन आणि ९ मोटारसायकली असा एकूण ११ लाख २४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर / अहिल्यानगर, ३ जुलै २०२५: 

अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या एका मोठ्या जुगार अड्ड्यावर बुधवारी छापा टाकून तब्बल ११ लाख २४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत जुगार खेळणाऱ्या आणि खेळवणाऱ्या १४ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना दिले होते. त्यानुसार, पोलीस निरीक्षक आहेर यांच्या नेतृत्वाखालील पथके जिल्ह्यात अवैध व्यवसायांवर कारवाया करत आहे. एलसीबीच्या या कारवाईमुळे स्थानिक पोलिसांचे पितळ उघडे पडले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार बिरप्पा सिध्दप्पा करमल, बाळासाहेब ज्ञानदेव नागरगोजे, अशोक हिरामन लिपणे, आकाश राजेंद्र काळे आणि रमिझराजा रफिक आतार हे संगमनेर शहर परिसरात गस्त घालत असताना, त्यांना तळेगाव ते नादुर शिंगोटे रस्त्यालगत एका बांधकाम सुरू असलेल्या घरात तिरट नावाचा जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाली.

पथकाने तात्काळ घटनास्थळी जाऊन खातरजमा केली असता, काही इसम पत्त्यांवर पैसे लावून जुगार खेळत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी छापा टाकून पहिल्या डावातील अजीज अबु शेख (रा. तळेगाव दिघे), आकाश बाबासाहेब गडाख (रा. पारेगाव बु.), योगेश दत्तात्रय राहटळ (रा. चिंचोली गुरव), भास्कर बाबुराव पगार (रा. चिंचोली गुरव), महेंद्र सुंदरलाल पाटणी (रा. तळेगाव दिघे), कैलास कारभारी मळे (रा. काकडवाडी) आणि नंदु म्हतु पिंगळे (रा. तळेगाव दिघे) या सात जणांना, तर दुसऱ्या डावातील इरफान युनिस शेख (रा. लोणी, हसनापूर), आशिफ कासम शेख (रा. करोले), रविद्र विठ्ठल जेजुरकर (रा. ममदापूर), एकनाथ रोहीदास जोरवेकर (रा. पोरेगाव), विलास भास्कर जगताप (रा. तळेगाव दिघे), दशरथ बिरु कांदळकर (रा. वरझडी बु.) आणि विजय रंभाजी ढवळे (रा. पारेगाव बु.) या सात जणांना असे एकूण १४ आरोपींना ताब्यात घेतले.

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडून जुगार खेळण्यासाठी लागणारे साहित्य, रोख रक्कम, १३ मोबाईल फोन आणि ९ मोटारसायकली असा एकूण ११ लाख २४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलीस अंमलदार रमिझराजा रफिक आतार यांच्या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,542
अहिल्यानगर एलसीबी जुगार कारवाई
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

By Annant Ppangarkar18/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर शहरातील बहुचर्चित आणि वादग्रस्त ठरलेल्या एमडी ड्रग प्रकरणाला आता…

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.