Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरात बेकायदेशीर कत्तलखान्यांविरोधात पोलीस उपाधीक्षक अँक्टिव्ह मोडवर! तीन धडक कारवाईत लाखोंचा मुद्देमाल जप्त, तिघे अटकेत तर तिघे फरार
गुन्हेगारी

संगमनेरात बेकायदेशीर कत्तलखान्यांविरोधात पोलीस उपाधीक्षक अँक्टिव्ह मोडवर! तीन धडक कारवाईत लाखोंचा मुद्देमाल जप्त, तिघे अटकेत तर तिघे फरार

पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे यांच्या सक्रिय भूमिकेमुळे संगमनेरातील बेकायदेशीर कत्तलखान्यांवर चाप बसण्यास मदत देण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/07/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, ४ जुलै २०२५: 

संगमनेर शहरात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या गोवंश कत्तलखान्यांवर पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने धडक कारवाई करत लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. वेगवेगळ्या छाप्यांमध्ये पोलिसांनी गोमांस, कत्तलीसाठी आणलेली जनावरे आणि कत्तलीसाठी वापरण्यात येणारे साहित्य ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे अवैध धंदे चालवणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

गुरुवारी रात्री पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने बेकायदेशीर सुरू असलेल्या कत्तलखान्यावर महत्त्वपूर्ण छापा टाकला. या छाप्यामध्ये मदिनानगर येथून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात सहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील तिघांना अटक करण्यात आली असून तिघेजण फरार झाल्याची माहिती मिळाली.

मदिनानगर परिसरातील सोफियान कुरेशीच्या वाड्यात गोवंश जनावरांची कत्तल सुरू असल्याच्या माहितीच्या आधारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय मेंगाळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुहास मोरे आणि पोलीस नाईक राहुल डोके यांच्या पथकाने सायंकाळी ६.३० वाजता छापा टाकला असता, पत्र्याच्या वाड्यात गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल होत असल्याचे पथकाला आढळून आले. संशयित आरोपी कत्तल केलेल्या जनावरांचे अनावश्यक अवयव, गोमांस वाड्याच्या बाहेर उभ्या असलेल्या एका रिक्षात भरताना आढळून आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मकसूद फिरोज कुरेशी (वय २३, रा. भारतनगर, संगमनेर), अहमद सांडु कुरेशी (वय ३२, रा. जमजम कॉलनी, संगमनेर) आणि मोहंमद रफिक शेख (वय ४०, रा. जमजम कॉलनी, संगमनेर) या तिघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी सांगितले की, सदर वाडा सोफियान नासिर कुरेशी (रा. मदिनानगर, संगमनेर) याचा असून, सोनू उर्फ आतिक रफिक कुरेशी आणि सालेम रियाज कुरेशी (दोघे रा. मोगलपुरा, संगमनेर) यांच्या सांगण्यावरून ते कत्तल करत होते.

घटनास्थळावरून पोलिसांनी सुमारे ६ लाख रुपये किमतीचे २००० किलो गोमांस आणि अनावश्यक अवयव, ३५,००० रुपये किमतीची एक विना नंबरची काळ्या रंगाची रिक्षा, ५,००० रुपये किमतीचा एक हिरव्या रंगाचा इलेक्ट्रॉनिक वजन काटा आणि २,५०० रुपये किमतीची एक कुऱ्हाड, दोन टोचे, एक सुरा व एक लोखंडी हुक असा एकूण ६,४२,५००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या तीन आरोपींसह फरार असलेले सोफियान नासिर कुरेशी, सोनू उर्फ आतिक रफिक कुरेशी आणि सालेम रियाज कुरेशी अशा एकूण सहा जणांविरोधात बीएनएस कलम २७१, ३२५, ३ (५) सह महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम सन १९९५ चे सुधारीत २०१५ चे कलम ५, ५ (क), ९, ९ (अ), आर्म ॲक्ट ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फरार आरोपी कमरअली सौदागर विरोधात पुन्हा गुन्हा… शुक्रवारी (४ जुलै) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास पेट्रोलिंग करत असताना पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक घोडे, पोलीस नाईक राहुल डोके आणि पोलीस कॉन्स्टेबल खेडकर यांनी जमजम कॉलनी परिसरात कमरअली गुलाम जिलानी सौदागर यांच्या वाड्यावर छापा टाकला. यावेळी तेथे गोवंश जनावरांची कत्तल केल्याचे आणि त्यांचे अनावश्यक अवयव आढळून आले.

कारवाईदरम्यान आरोपी कमरअली गुलाम जिलानी सौदागर (रा. भारतनगर संगमनेर) हा अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला. घटनास्थळी पोलिसांना सुमारे १.५ लाख रुपये किमतीचे गोमांस, गोमांसाचे अनावश्यक अवयव, दुसऱ्या वाहनांमध्ये भरलेले गोमांस आणि कुऱ्हाड आदी साहित्य आढळून आले. फरार झालेल्या आरोपी कमरअली विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांच्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता कलम २७१, ३२५ सह महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९८५ चे कलम ५, ५ (क), ९, ९ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, याच आरोपी विरोधात गेल्या आठवड्यातही पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने कारवाई केली होती. त्यावेळी कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेली सुमारे १.७५ लाख रुपये किमतीची जिवंत जनावरे आरोपीच्या तावडीतून सोडवण्यात पोलिसांना यश आले होते. पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांनी दिलेल्यातक्रारीवरून कमरअली गुलाम सौदागर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आठवडाभरात दुसऱ्यांदा त्याच्यावर कारवाई झाल्याने त्याची मुजोरी समोर आली आहे.

पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे यांच्या सक्रिय भूमिकेमुळे संगमनेरातील बेकायदेशीर कत्तलखान्यांवर चाप बसण्यास मदत देण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,768
कत्तलखाना कारवाई कत्तलखाना छापा कुणाल सोनवणे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

By Annant Ppangarkar18/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर शहरातील बहुचर्चित आणि वादग्रस्त ठरलेल्या एमडी ड्रग प्रकरणाला आता…

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.