Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

शुक्रवार, १८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे सर्व राशीचे राशी भविष्य

18/09/2026

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » वाळू तस्करांवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई: १९.९० लाखांचा मुद्देमाल जप्त, ४ आरोपी ताब्यात
गुन्हेगारी

वाळू तस्करांवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई: १९.९० लाखांचा मुद्देमाल जप्त, ४ आरोपी ताब्यात

पथकाने पकडलेल्या ट्रॅक्टर चालकांकडे वाळू वाहतूक आणि उपसा करण्याचा कोणताही परवाना नव्हता.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – अहिल्यानगर: 

अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने श्रीरामपूर तालुक्यात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे १९,९०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे बाळासाहेब नागरगोजे, अशोक लिपणे, संदीप दरंदले, रणजीत जाधव, आकाश काळे आणि रमीजराजा आत्तार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

गुरुवारी (३ जुलै) पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव शिवारातील गोदावरी नदीपात्रातून दोन व्यक्ती ट्रॅक्टर-ट्रॉलीमधून वाळू उपसा करून तिची वाहतूक करत आहेत. या माहितीच्या आधारे, पथकाने पंचांसह छापा टाकला. त्यावेळी, दोन ट्रॅक्टरमध्ये मजुरांच्या सहाय्याने वाळू भरली जात असताना आढळून आले.

पथकाने तात्काळ कारवाई करत दोन ट्रॅक्टर चालक, करण अशोक वाघ (वय २०, रा. नायगाव, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) आणि अनिल नारायण आमले (वय २४, रा. गोंडेगाव, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) यांना ताब्यात घेतले. तसेच, ट्रॅक्टर मालक दत्तात्रय रावसाहेब भवार (रा. गोंडेगाव, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) आणि आदित्य काकासाहेब दिवे (रा. गोंधवणी वॉर्ड नं. १, श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) यांनाही ताब्यात घेण्यात आले.

 पथकाने पकडलेल्या ट्रॅक्टर चालकांकडे वाळू वाहतूक आणि उपसा करण्याचा कोणताही परवाना नव्हता. त्यामुळे घटनास्थळावरून दोन ट्रॅक्टर, ट्रॉली आणि दोन मोटरसायकली असा एकूण १९,९०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ताब्यात घेतलेल्या आरोपींना मुद्देमालासह श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये हजर करण्यात आले. त्यांच्याविरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुरनं ३५३/२०२५, बीएनएस २०२३ च्या कलम ३०३ (२), ३ (५) वगैरे नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस करत आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे (श्रीरामपूर) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे (श्रीरामपूर उपविभाग) यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,423
अहिल्यानगर एलसीबी कारवाई बेकायदा वाळू वाहतूक वाळू वाळू उत्खनन
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

By Annant Ppangarkar18/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध वाळू उपसा आणि छुप्या मार्गाने होणाऱ्या…

शुक्रवार, १८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे सर्व राशीचे राशी भविष्य

18/09/2026

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.