Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

21/09/2026

सोमवार २१ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

21/09/2026

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

20/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आमदार खताळांनी केले दुसऱ्या टप्प्यातील ५ नव्या एसटी बसेसचे लोकार्पण
राजकारण

आमदार खताळांनी केले दुसऱ्या टप्प्यातील ५ नव्या एसटी बसेसचे लोकार्पण

आमदार खताळ यांच्या पाठपुराव्याने संगमनेर डेपोसाठी १० नव्या बसेस मिळाल्या
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/07/2025Updated:06/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी – 

तीन महिन्याच्या कालखंडात एसटी महामंडळाच्या संगमनेर आगारात १० नवीन बसेस (लालपरी) दाखल झाल्या आहेत. यात आज आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते ५ नवीन बसेसचे पूजन करून लोकार्पण करण्यात आले. यावेळी आमदार खताळ यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांसह नव्या एसटी बसमधून शहरातील मुख्य मार्गावरून फेरफटका मारला.

आमदार अमोल खताळ यांनी यावेळी बोलताना, संगमनेर आगारातील एसटी कर्मचारी, चालक, वाहक यांच्या समस्या शासन दरबारी मांडून सोडविल्या जातील असे आश्वासन दिले.

आषाढी एकादशीपूर्वीच नव्या एसटी बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. साडेतीन महिन्यांपूर्वी आमदार खताळ यांच्या पाठपुराव्याने संगमनेर डेपोसाठी १० नव्या बसेस मिळाल्या होत्या. यापैकी ५ बसेस या अगोदरच आगारात दाखल झाल्या होत्या. उर्वरित ५ एसटी बसेसही आता आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर डेपोला प्राप्त झाल्या आहेत.

या सर्व बसेस मिळाल्याबद्दल आगार व्यवस्थापक प्रशांत गुंड यांनी आमदार अमोल खताळ यांचे आभार मानले. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर या नवीन बसेस प्रवाशांसाठी सोयीस्कर ठरतील, असेही ते म्हणाले.

या लोकार्पण सोहळ्याला शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ रहाणे, शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी, महिला जिल्हा उपप्रमुख दीपाली वाव्हळ, भाजप शहर अध्यक्ष पायल ताजने, मेघा भगत, उषा कपिले, आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर कर्पे, शिरीष मुळे, कैलास वाकचौरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, ॲड. संग्राम जोंधळे यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते आणि संगमनेर आगारातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आगारप्रमुख प्रशांत गुंड यांनी केले, सूत्रसंचालन अजित जाधव यांनी केले तर आभार वाहतूक नियंत्रक गायकवाड यांनी मानले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,399
अमोल खताळ एसटी बस लोकार्पण
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

By Annant Ppangarkar21/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सोशल मीडिया हे आजच्या माहितीच्या युगात अत्यंत प्रभावी माध्यम बनले…

सोमवार २१ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

21/09/2026

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

20/09/2026

रविवार विशेष लेख — नाकर्त्या राज्यकर्त्यांचा बहुभाषिक महाराष्ट्र

20/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.