Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

21/09/2026

सोमवार २१ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

21/09/2026

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

20/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महिलांना साहित्य वाटप: घरेलू कामगार योजनेच्या नावाखाली पैशांची मागणी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार: आ. खताळ
राजकारण

महिलांना साहित्य वाटप: घरेलू कामगार योजनेच्या नावाखाली पैशांची मागणी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार: आ. खताळ

काही दलालांनी महिलांकडून पैसे घेतल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून, अधिवेशन संपल्यानंतर कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत पुढील कार्यवाही केली जाईल
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी:

महायुती सरकारने सुरू केलेल्या घरेलू कामगार योजनेअंतर्गत महिलांना मोफत साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी आमदार अमोल खताळ यांनी तालुक्यात काही दलालांकडून लाभार्थींची दिशाभूल केली जात असल्याच्या तक्रारींवरून तीव्र नाराजी व्यक्त केली. कोणताही योजनेसाठी पैसे देऊ नका, असे आवाहन करत, पैसे घेऊन लाभार्थींची आणि महायुती सरकारची बदनामी करणाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा आमदार खताळ यांनी दिला.

महायुती सरकारने घरेलू कामगार महिलांसाठी सुरू केलेल्या योजनेतील लाभार्थी महिलांना आ. अमोल खताळ यांच्या उपस्थितीत साहित्याचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी रामभाऊ राहाणे, शिवसेना शहराध्यक्ष विनोद सूर्यवंशी, दिपाली वाव्हळ, आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार, पायल ताजणे, गुलाब भोसले, श्रीकांत गोमासे, गोकुळ दिघे, रेखा गलांडे यांच्यासह कामगार विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

आमदार अमोल खताळ यांनी यावेळी बोलताना सांगितले की, महायुती सरकारने सर्वसामान्य माणूस केंद्रीभूत मानून योजनांचे निर्णय घेतले आहेत आणि त्यांची अंमलबजावणी राज्यात यशस्वीपणे सुरू आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून या योजना सर्व लाभार्थींपर्यंत पोहोचत आहेत. घरेलू कामगार योजनेसाठी नाव नोंदणी करताना मोफत नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, परंतु काही दलालांनी महिलांकडून पैसे घेतल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून, अधिवेशन संपल्यानंतर कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत पुढील कार्यवाही केली जाईल, असे खताळ यांनी स्पष्ट केले.

तालुक्यात काही मंडळींकडून महायुती सरकारला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. लोकांकडून आता माहिती आणि आधार कार्ड नंबर मागितले जात आहेत. कोणालाही आपली व्यक्तिगत माहिती किंवा आधार कार्ड नंबर देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले. कोणत्याही योजनेसाठी पैसे द्यावे लागत नाहीत. पालकमंत्री कार्यालय तसेच माझे संपर्क कार्यालय जनतेसाठी सुरू असून, लोकांनी स्वतः येऊन योजनेसाठी नोंदणी करावी. शासकीय कार्यालयात कोणी पैसे मागत असेल, तर आमच्याकडे तक्रारी करा, असेही खताळ म्हणाले.

दिव्यांग बांधवांसाठी मोफत शिबिराचे आयोजन- केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, कानपूर व एस. आर. ट्रस्ट, मध्य प्रदेश, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन संचलित, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग, अहिल्यानगर आणि विविध दिव्यांग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने, एडीप (ADIP) या योजनेंतर्गत घुलेवाडी ग्रामीण रुग्णालय येथे १३ जुलै २०२५ रोजी अस्थिव्यंग प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत कृत्रिम हात, पाय बसविणे, कॅलिपर्स यांचे मोजमाप व तात्काळ मोफत जागेवर साहित्य वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा दिव्यांग बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार खताळ यांनी केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,240
अमोल खताळ घरेलू कामगार साहित्य वितरण
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

By Annant Ppangarkar21/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सोशल मीडिया हे आजच्या माहितीच्या युगात अत्यंत प्रभावी माध्यम बनले…

सोमवार २१ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

21/09/2026

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

20/09/2026

रविवार विशेष लेख — नाकर्त्या राज्यकर्त्यांचा बहुभाषिक महाराष्ट्र

20/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.