Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सोमवार २१ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

21/09/2026

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

20/09/2026

रविवार विशेष लेख — नाकर्त्या राज्यकर्त्यांचा बहुभाषिक महाराष्ट्र

20/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » निळवंडे प्रकल्पासाठी केंद्राकडून ५,०२३ कोटी रुपयांचा निधी मंजूर
राजकारण

निळवंडे प्रकल्पासाठी केंद्राकडून ५,०२३ कोटी रुपयांचा निधी मंजूर

या निधीमुळे प्रकल्पाच्या कालव्यांच्या उर्वरित कामांना गती मिळेल, असे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/07/2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर: 

अहिल्यानगर जिल्ह्यातील जिरायती भागासाठी वरदान ठरलेल्या निळवंडे (ऊर्ध्व प्रवरा) प्रकल्पाच्या उर्वरित कामांसाठी केंद्र सरकारने ५,०२३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. केंद्रीय जल आयोगाच्या तांत्रिक सल्लागार समितीने या निधीला मान्यता दिल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

केंद्रीय जलसंसाधन मंत्रालयाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जल आयोगाच्या तांत्रिक सल्लागार समितीच्या १५९ व्या बैठकीत निळवंडे प्रकल्पाला ही मान्यता मिळाली. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहाता, कोपरगाव, राहुरी या तालुक्यांतील आणि नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एकूण ६८ हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे.

या निधीमुळे प्रकल्पाच्या कालव्यांच्या उर्वरित कामांना गती मिळेल, असे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. १९७० मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाचा अपेक्षित लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकल्पामध्ये निळवंडे धरण, ७० किलोमीटर लांबीचा उजवा कालवा आणि ८५ किलोमीटर लांबीचा डावा कालवा यांचा समावेश आहे. या प्रकल्पातून वर्षाला १०.५ टीएमसी पाण्याचा वापर होणार आहे.

विशेष म्हणजे, या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहोचवण्याचे नियोजन विभागाने केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने निळवंडे प्रकल्पाच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या सहकार्यामुळेच लाभक्षेत्रातील शेवटच्या शेतकऱ्याला पाणी मिळाले असल्याचे विखे यांनी म्हटलं आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 696
निधी निळवंडे धरण पाण्याचे राजकारण राधाकृष्ण विखे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

सोमवार २१ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar21/09/20260

मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचे नवीन मार्ग उघडणारा ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीचे चीज होईल आणि…

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

20/09/2026

रविवार विशेष लेख — नाकर्त्या राज्यकर्त्यांचा बहुभाषिक महाराष्ट्र

20/09/2026

आज रविवार, २० सप्टेंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

20/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.