Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये गोवंश कत्तलीच्या उद्देशाने बांधलेल्या ३५ वासरांची सुटका; एकावर गुन्हा दाखल
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये गोवंश कत्तलीच्या उद्देशाने बांधलेल्या ३५ वासरांची सुटका; एकावर गुन्हा दाखल

पथकाने सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी पंचांसमक्ष पाहणी केली असता, त्या ठिकाणी लहान वासरे बांधलेली आढळून आली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, ०९ जुलै २०२५-प्रतिनिधी: 

संगमनेर पोलिसांनी कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेली ३५ लहान वासरे ताब्यात घेऊन एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी कुरण येथील कब्रस्तानजवळील एका पत्र्याच्या शेडमध्ये करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांना या संदर्भात गोपनीय माहिती मिळाली होती. कुरण येथील शौकतअली मोहम्मद शेख (वय ३०, रा. कुरण) याने आपल्या पत्र्याच्या शेडमध्ये गोवंश जातीची जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवली आहेत. या माहितीच्या आधारे डॉ. सोनवणे यांनी तात्काळ तपास पथकाला कारवाईचे आदेश दिले.

पोलीस उपअधीक्षक सोनवणे यांच्या पथकातील पोलीस हवालदार राहुल सारबंदे आणि राहुल डोके यांनी शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल अजित कुऱ्हे आणि रोहिदास शिरसाठ यांना सोबत घेतले. तसेच खाजगी वाहनाने कुरण येथील संबंधित ठिकाणी रवाना झाले.

पथकाने सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी पंचांसमक्ष पाहणी केली असता, त्या ठिकाणी लहान वासरे बांधलेली आढळून आली. स्थानिक चौकशीअंती ही जनावरे शौकतअली मोहम्मद शेख याच्या मालकीची असून, त्याने ती कत्तल करण्यासाठी बांधल्याचे समोर आले.

ताब्यात घेण्यात आलेल्या ३५ वासरांची किंमत अंदाजे रु. ३५,०००/- असून, ती काळ्या, पांढऱ्या आणि तांबड्या रंगाची आहेत. बांधलेल्या वासरांची सुटका करत ही वासरे पथकाने ताब्यात घेत पुढील देखभालीसाठी या सर्व वासरांना सायखिंडी येथील जीवदया गोशाळेत पाठवण्यात आले आहे.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात शौकतअली मोहम्मद शेख याच्याविरोधात महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम १९९५ सुधारित २०१५ च्या कलम ५ (अ), १, ९ सह प्राण्यांना निर्दयतेने वागवण्याचे कलम ३, ११ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,421
कत्तलखाना कारवाई कुणाल सोनवणे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

By Annant Ppangarkar18/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर शहरातील बहुचर्चित आणि वादग्रस्त ठरलेल्या एमडी ड्रग प्रकरणाला आता…

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.