Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये पती-पत्नीचा गूढ मृत्यू: घातपात की आत्महत्या पोलीस तपास सुरू
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरमध्ये पती-पत्नीचा गूढ मृत्यू: घातपात की आत्महत्या पोलीस तपास सुरू

सर्व शक्यतांचा तपास आश्वी पोलीस करत आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/07/2025Updated:11/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्तसेवा

संगमनेर, प्रतिनिधी: 

संगमनेर तालुक्यातील सादतपूर येथे एकाच दिवशी पती-पत्नीचा गूढ मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. पत्नीचा मृतदेह शेततळ्यात, तर पतीचा मृतदेह घरात संशयास्पदरीत्या आढळला आहे. हा घातपात आहे की आत्महत्या, याबाबतचे गूढ कायम असून, आश्वी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

रेवजी मुरलीधर गायकर (वय ६०) आणि त्यांच्या पत्नी नंदा गायकर (वय ५५) अशी मृतांची नावे आहेत. रेवजी गायकर हे एका शिक्षण संस्थेत नोकरीला होते आणि तीन वर्षांपूर्वीच त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. शेती आणि निवृत्ती वेतनावर त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. त्यांना एक मुलगा आणि तीन मुली असून, सर्वांचे विवाह झाले आहेत. मुली सासरी असतात, तर मुलगा नोकरीनिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे राहतो. त्यामुळे रेवजी आणि नंदा हे दोघेच घरी राहत होते.

गुरुवारी (१० जुलै २०२५) सकाळपासून निमगावजाळी येथे राहणाऱ्या त्यांच्या विवाहित मुलीने अनेकदा आई-वडिलांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर तिने जवळच राहणाऱ्या चुलतभावाला त्यांच्या घरी जाऊन चौकशी करण्यास सांगितले. चुलतभावाने रेवजी यांच्या घराचा दरवाजा उघडून पाहिले असता, रेवजी यांचा मृतदेह जमिनीवर पडलेला आणि त्यांच्या तोंडातून फेस आलेला दिसला. तर, काही अंतरावर असलेल्या घराजवळच्या शेततळ्यात नंदा यांचा मृतदेह आढळून आला.

घटनेची माहिती मिळताच आश्वी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केल्यानंतर दोन्ही मृतदेहांना प्रवरा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. रात्री उशिरा गोगलगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे गोगलगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

रेवजी आणि नंदा यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. रेवजी यांच्या तोंडातून फेस आल्याने त्यांनी विष प्राशन केले की त्यांना कोणी विष दिले, तसेच नंदा यांचा मृतदेह शेततळ्यात आढळल्याने त्या पाय घसरून पडल्या की त्यांचाही घातपात झाला, या सर्व शक्यतांचा तपास आश्वी पोलीस करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 3,294
आश्वी पोलीस मृत्यू
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी परिसरात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे…

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.