Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

18/10/2026

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आमदार खताळ यांची अधिवेशनात मागणी: संगमनेर गटार दुर्घटनेतील दोषी ठेकेदारांना काळ्या यादीत टाका, मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्या
राजकारण

आमदार खताळ यांची अधिवेशनात मागणी: संगमनेर गटार दुर्घटनेतील दोषी ठेकेदारांना काळ्या यादीत टाका, मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्या

चेंबरमधील विषारी वायूमुळे पवारचा गुदमरून मृत्यू झाला आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असलेल्या रियाजलाही आपला जीव गमवावा लागला
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्तसेवा 

संगमनेर, प्रतिनिधी: 

संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोडवरील भूमिगत गटार साफसफाईच्या कामात ठेकेदारांच्या बेजबाबदारपणामुळे आणि निष्काळजीपणामुळे घडलेल्या दुर्घटनेत अतुल रतन पवार आणि रियाज जावेद पिंजारी या दोघा तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी संबंधित ठेकेदारांना तात्काळ काळ्या यादीत टाकण्याची मागणी आमदार अमोल खताळ यांनी अधिवेशनात केली आहे. तसेच, या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना भरीव आर्थिक मदत देण्याची मागणीही त्यांनी केली.

या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या अतुल पवार याच्या कुटुंबीयांना नियमानुसार शासनाकडून ३० लाख रुपये आर्थिक मदत मिळत आहे. मात्र, जीव धोक्यात घालून पवार याला वाचवण्यासाठी पुढे सरसावलेल्या रियाज पिंजारी याच्या कुटुंबीयांनाही शासनाने भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आमदार खताळ यांनी सभागृहात केली.

यावेळी सभागृहात बोलताना खताळ म्हणाले, ‘गटारातील मैला हाताने साफ करण्यास प्रतिबंध आणि पुनर्वसन करणारा २०१५ चा कायदा’ अस्तित्वात असतानाही संबंधित ठेकेदाराने या कायद्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. सुरक्षा उपाययोजना पूर्णपणे धाब्यावर बसवण्यात आल्या होत्या. चेंबरमधील मैला साफ करण्याचे काम यंत्रसामग्रीच्या साहाय्याने करणे आवश्यक असताना, ठेकेदाराने अतुल पवारला कोणतीही सुरक्षा उपकरणे न देता चेंबरमध्ये उतरवले. चेंबरमधील विषारी वायूमुळे पवारचा गुदमरून मृत्यू झाला आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असलेल्या रियाजलाही आपला जीव गमवावा लागला. या हृदयद्रावक घटनेमुळे दोन्ही तरुणांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या प्रकरणी संबंधित ठेकेदारावर संगमनेर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी, भविष्यात अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत यासाठी संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे अशी ठाम भूमिका आमदार खताळ यांनी विधानसभेत मांडली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 952
अमोल खताळ गटार दुर्घटना पावसाळी अधिवेशन मागणी विधिमंडळ अधिवेशन
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

By Annant Ppangarkar18/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर (तोफखाना) आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील…

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.