Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

21/09/2026

सोमवार २१ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

21/09/2026

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

20/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आमदार खताळ यांच्या हस्ते भोजापूर धरणाचे जलपूजन: दुष्काळी भागाची पाणीटंचाई मिटणार
राजकारण

आमदार खताळ यांच्या हस्ते भोजापूर धरणाचे जलपूजन: दुष्काळी भागाची पाणीटंचाई मिटणार

जलसंपदा खाते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे असल्याने आता पाण्यासाठी वणवण फिरावे लागणार नाही. या पूरचारीसाठी मंत्री विखे पाटील यांच्याकडून २० कोटी रुपये मंजूर करून घेतल्याचे त्यांनी नमूद केले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त

संगमनेर, प्रतिनिधी: 

संगमनेर तालुक्यातील निमोण आणि तळेगाव परिसरातील दुष्काळी गावांना वरदान ठरणाऱ्या भोजापूर धरणाचे पाणी आता थेट दुष्काळी भागापर्यंत पोहोचणार आहे. 

आमदार अमोल खताळ यांनी रविवारी (आज) भोजापूर धरणाचे जलपूजन केले आणि ग्रामस्थांसोबत भोजापूर पूरचारीची पाहणी केली. यामुळे अनेक वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या या भागाला आता टँकरमुक्त पाणीपुरवठा होण्याची आशा निर्माण झाली आहे.

यावेळी बोलताना, आमदार खताळ यांनी विश्वास व्यक्त केला की, आता भोजापूर धरणातील ओव्हरफ्लोचे पाणी तळेगाव आणि निमोण या दुष्काळी भागातील जनतेला त्यांच्या हक्काने मिळेल. यापूर्वी निवडणुका जवळ आल्या की केवळ टँकरने चारीमध्ये पाणी आणून दाखवले जात होते, मात्र आता ही परिस्थिती बदलणार आहे.

भोजापूर धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर आमदार खताळ यांच्या हस्ते त्याचे पूजन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी धरणापासून जाणाऱ्या डाव्या कालव्यावरील पूरचारीची (ज्यावर पळसखेडे, निमोण, कऱ्हे, सोनेवाडी, सोनोशी, वाटमाई देवी, आणि गीते वस्ती हे भाग अवलंबून आहेत) पाहणी केली. निमोण येथील तलावाचे जलपूजनही आमदार खताळ यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाप्रसंगी आमदार खताळ यांनी सांगितले की, जलसंपदा खाते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे असल्याने आता पाण्यासाठी वणवण फिरावे लागणार नाही. या पूरचारीसाठी मंत्री विखे पाटील यांच्याकडून २० कोटी रुपये मंजूर करून घेतल्याचे त्यांनी नमूद केले. निमोण आणि तळेगाव या दुष्काळी भागातील गावांना हक्काचे पाणी मिळवून देणे, हे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आपले ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर तिगाव माथ्यापर्यंत या पूरचारीचे पाणी पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी नाशिक जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, उपअभियंता सुभाष पगारे, शाखा अभियंता शरद नागरे, संगमनेर उपविभागाचे उपविभागीय जलसंधारण अधिकारी प्रल्हाद शिंदे, जलसंधारण अधिकारी सुरेश मंडलिक, सनी पगार यांच्यासह पूरचारीच्या लाभक्षेत्रातील गावातील शेतकरी, नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

महायुती सरकारचे धोरण प्रत्येक गावात येणाऱ्या मुख्य रस्त्याचे मजबुतीकरण करून कॉंक्रिटीकरण करण्याचे असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले. तसेच, निमोण येथील जगदंबा माता मंदिराच्या विकासासाठी प्रस्ताव दिल्यास, जिल्हा नियोजनच्या बैठकीत या मंदिराला क वर्ग दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

निमोणचे सरपंच संदीप देशमुख यांनी यावेळी बोलताना सांगितले की, आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून निमोण गावातील २६ बंधाऱ्यांच्या खोलीकरणाचे काम मंजूर झाले होते, त्यापैकी २० ते २२ बंधाऱ्यांचे काम पूर्ण झाले आहे. त्या बंधाऱ्यांमध्ये आता भोजापूर पूरचारीचे पाणी आल्याने निमोणकरांना पाण्याची चिंता करण्याची गरज नाही.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,091
अमोल खताळ पाणी पूजन भोजापुर चारी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

By Annant Ppangarkar21/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सोशल मीडिया हे आजच्या माहितीच्या युगात अत्यंत प्रभावी माध्यम बनले…

सोमवार २१ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

21/09/2026

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

20/09/2026

रविवार विशेष लेख — नाकर्त्या राज्यकर्त्यांचा बहुभाषिक महाराष्ट्र

20/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.