Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » रोटरी क्लब संगमनेरचा पदग्रहण सोहळा उत्साहात; विश्वनाथ मालाणी अध्यक्ष, सौरभ म्हाळस सचिव; डॉ. उल्हास कोल्हटकर यांच्याकडून कौतुक
सामाजिक

रोटरी क्लब संगमनेरचा पदग्रहण सोहळा उत्साहात; विश्वनाथ मालाणी अध्यक्ष, सौरभ म्हाळस सचिव; डॉ. उल्हास कोल्हटकर यांच्याकडून कौतुक

यावेळी रोटरी परिवारातील अनेक यशस्वी सदस्यांचा सत्कार करण्यात आला
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी: 

रोटरी केवळ एक सेवाभावी संघटना नव्हे, तर ‘समाजसेवक घडवणारी जीवनशाळा’ आहे, एक उत्तम रोटेरियन कसा असावा आणि समाजाशी त्याचे नाते किती घट्ट असावे असे संबोधत रोटरीच्या ४२ वर्षांच्या समाजकार्याचा डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी गौरव केला.

२०२५-२६ या वर्षासाठी विश्वनाथ मालाणी यांची अध्यक्षपदी, सौरभ म्हाळस यांची सचिवपदी, तर संकेत काजळे यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली. या पार्श्वभूमीवर रोटरी क्लब संगमनेरने नुकताच आपला वार्षिक पदग्रहण सोहळा मालपाणी लॉन्स येथे मोठ्या उत्साहात साजरा केला. 

रविवार, १३ जुलै रोजी झालेल्या या सोहळ्याला डॉ. कोल्हटकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर आमदार अमोल खताळ, सहाय्यक प्रांतपाल अमोल वैद्य, माजी अध्यक्ष साईनाथ साबळे, आणि नवनियुक्त पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार अमोल खताळ यांनी रोटरी क्लबच्या कार्याची प्रशंसा करत, “रोटरी आय केअर ट्रस्ट हे तालुक्यातील गोरगरीबांसाठी वरदान ठरले आहे,” असे गौरवोद्गार काढले. त्यांनी नूतन कार्यकारिणीला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात रोटरी क्लब संगमनेरचा प्रतिष्ठित ‘रोटरी सेवा गौरव पुरस्कार’ संत श्री गाडगेबाबा भानूप्रभाकर सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक प्रा. चं. का. देशमुख यांना सपत्नीक प्रदान करण्यात आला. प्रा. देशमुख यांनी या सन्मानाबद्दल रोटरीचे आभार मानले.

प्रांतपाल रो. सुधीर लातुरे यांचा शुभेच्छा संदेश सहाय्यक प्रांतपाल रो. अमोल वैद्य यांनी वाचून दाखवला. मावळते अध्यक्ष रो. साईनाथ साबळे यांनी आपल्या वर्षभरातील विविध सामाजिक उपक्रमांचा आढावा सादर केला.

यावेळी रोटरी परिवारातील अनेक यशस्वी सदस्यांचा सत्कार करण्यात आला, ज्यात पूनम मालाणी, आरती मणियार, सावित्री वाकचौरे, मनस्वी साबळे आणि आदित्य राठी यांचा समावेश होता. तसेच, रो. ममता वर्मा यांना ‘रोटरी जीवन संजीवनी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

नवनिर्वाचित अध्यक्ष रो. विश्वनाथ मालाणी यांनी आपल्या प्रेरणादायी जीवनप्रवासाची चित्रफीत सादर करत आगामी वर्षातील विविध सामाजिक प्रकल्पांची माहिती दिली. रोटरी आय केअर ट्रस्टचे अध्यक्ष संजय लाहोटी यांनी संस्थेने राबवलेले प्रकल्प आणि त्यांच्या सामाजिक योगदानावर प्रकाश टाकला.

२०२५-२६ च्या रोटरी कार्यकारिणीमध्ये महेश वाकचौरे (उपाध्यक्ष), किशोर पोखरकर, राजेंद्र खोसे, साईनाथ साबळे, पवनकुमार वर्मा, दीपक मणियार, आनंद हासे, अजित काकडे, योगेश गाडे, ऋषिकेश मोंढे, विकास लावरे, मनमोहन वर्मा, डॉ. विकास करंजेकर, संकेत मेहता, विक्रम पडताणी, बद्रीनारायण इंदाणी, विनायक नागरे, मधुसूदन करवा, सुनील घुले, संजय राठी, दिलीप मालपाणी, भारतभूषण नावंदर, अमित पवार, रविंद्र पवार, कपिल चांडक, प्रमोद मणियार, संतोष आहेर, सुनील कडलग, संजय लाहोटी, नरेंद्र चांडक, मयूर मेहता, समीर शहा आदींचा समावेश आहे. 

कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन रो. भारतभूषण नावंदर व रो. समीर शहा यांनी केले, तर आभार प्रदर्शन सचिव रो. सौरभ म्हाळस यांनी केले. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण रोटरी परिवाराने सहभाग घेतला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 733
पदग्रहण रोटरी क्लब
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- यावर्षीचा दुष्काळ हा कोरोना संकटाप्रमाणे असून कठीण दुष्काळी संकटातून मार्ग काढत…

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.