Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांसाठी विशेष आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण शिबिर; आपत्कालीन प्रसंगात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा: डॉ. जयश्रीताई थोरात

16/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये शहीद मेजर संदीप घोडेकर यांच्या स्मारकाची काँग्रेसची मागणी
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरमध्ये शहीद मेजर संदीप घोडेकर यांच्या स्मारकाची काँग्रेसची मागणी

या मागणीसाठी संगमनेर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद ऑनलाईन वृत्त

संगमनेर, प्रतिनिधी: 

संगमनेरचे सुपुत्र, सीआरपीएफ जवान, मेजर संदीप घोडेकर यांच्या स्मरणार्थ संगमनेरमध्ये त्यांचे स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी संगमनेर शहर काँग्रेस कमिटीने केली आहे. देशसेवा बजावताना हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे दिल्लीत निधन झाले होते. मेजर घोडेकर यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाचा विचार करून हे स्मारक उभारणे आवश्यक असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

या मागणीसाठी संगमनेर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, विश्वास मुर्तडक, राजेंद्र वाकचौरे, गणेश मादास, नितीन अभंग, जावेदखान पठाण, मुजिक खान, वसीम शेख, आवेद खान, डॉ. विजय पवार, शेहेबाजअली शेख, अलोक बर्डे, बादल जेधे, ललित शिंदे, शरद पावबाके, एकनाथ श्रीपत, सुभाष दिघे, संजय कानवडे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, मेजर संदीप घोडेकर दिल्ली येथे भारतीय सैन्य दलात कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आले. त्यांची देशाप्रती असलेली निष्ठा आणि कर्तव्यपरायणता संगमनेर शहरातील नागरिकांना भविष्यात कायम देशसेवेसाठी प्रेरणा व स्फूर्ती देणारी ठरेल. त्यामुळे त्यांचे संगमनेर येथे स्मारक होणे गरजेचे आहे. याशिवाय, संगमनेर येथील अकोला नाका चौकाला शहीद मेजर संदीप घोडेकर यांचे नाव देण्याची मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे. या मागणीमुळे संगमनेरमध्ये शहीद मेजर संदीप घोडेकर यांच्या स्मृती जपण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे

घोडेकर यांचे बलिदान कायम स्मरणात राहील – बाळासाहेब थोरात

काँग्रेसचे वरिष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मेजर संदीप घोडेकर यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, “संगमनेरचे सुपुत्र मेजर संदीप घोडेकर यांना देशसेवा बजावत असताना मृत्यू आला. जवान हा घरदार सोडून देशाच्या सेवेकरता रात्रंदिवस सज्ज असतो. देश सेवा करताना वीरमरण आलेले हुतात्मा मेजर संदीप घोडेकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखदायक आणि मनाला वेदना देणारी आहे. त्यांनी देशाकरता दिलेले बलिदान हे संगमनेरकरांच्या कायम स्मरणात राहील.”

विशेष स्मारक उभारण्यासाठी प्रयत्नशील – डॉ. सुधीर तांबे

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनीही मेजर संदीप घोडेकर यांच्या योगदानाला आदरांजली वाहिली. ते म्हणाले, “संगमनेर शहरातील घोडेकर परिवारातील मेजर संदीप घोडेकर यांनी कायम देशसेवेला प्राधान्य दिले. देश सेवेसाठी जीवन समर्पित करणाऱ्या या वीर जवानाने अखेरचा श्वासही सेवेत घेतला. इतक्या लवकर जाणे दुर्दैवी आहे. त्यांच्या परिवाराच्या दुःखात संगमनेर तालुका परिवार सहभागी असून त्यांचे बलिदान हे देशासाठी असून सदैव संगमनेरकरांना संस्मरणीय राहील. मेजर संदीप घोडेकर यांचे संगमनेरमध्ये विशेष स्मारक उभारण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 819
काँग्रेस जवान संदीप घोडेकर बाळासाहेब थोरात सुधीर तांबे स्मारक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिबिर

संगमनेरमध्ये युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांसाठी विशेष आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण शिबिर; आपत्कालीन प्रसंगात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा: डॉ. जयश्रीताई थोरात

By Annant Ppangarkar16/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – धावपळीच्या आधुनिक जीवनशैलीत अचानक निर्माण होणाऱ्या वैद्यकीय आणीबाणीच्या…

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

दूषित पाणीपुरवठ्यामुळे राजापूरकरांचे आरोग्य धोक्यात; ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप

16/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.