Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आमदार अमोल खताळ यांच्या पुढाकाराने अतुल पवार यांच्या कुटुंबीयांना मुख्याधिकाऱ्यांनी दिला १० लाखाच्या मदतीचा धनादेश; उर्वरित मदतीचे आश्वासन
राजकारण

आमदार अमोल खताळ यांच्या पुढाकाराने अतुल पवार यांच्या कुटुंबीयांना मुख्याधिकाऱ्यांनी दिला १० लाखाच्या मदतीचा धनादेश; उर्वरित मदतीचे आश्वासन

रियाज पिंजारीलाही मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळावी: आमदार खताळ यांची मागणी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/07/2025Updated:18/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी: 

संगमनेर येथील गटार दुर्घटनेत दुर्दैवी निधन झालेल्या अतुल रतन पवार याच्या कुटुंबीयांना आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांमुळे शासनाकडून तातडीने १० लाख रुपयांची मदत मिळाली आहे. संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी हा धनादेश पवार कुटुंबीयांच्या निवासस्थानी जाऊन सुपूर्द केला.

आमदार खताळ यांच्या कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. १० जुलै २०२५ रोजी संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोडवरील नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलजवळ भूमिगत गटाराचे काम सुरू असताना गटार साफ करताना अतुल पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर आमदार अमोल खताळ यांनी पवार कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले होते आणि शासनाच्या वतीने ३० लाख रुपयांची मदत देण्याचे लेखी आश्वासन दिले होते.

आमदार खताळ यांच्या सूचनेनुसार, संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक रामदास कोकरे यांनी तात्काळ कार्यवाही करत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली आणि १० लाख रुपयांचा पहिला टप्पा मदतीचा धनादेश मृत अतुल पवार यांच्या आई-वडिलांकडे सुपूर्द केला. ही मदत मिळाल्याने पवार कुटुंबीयांनी आमदार अमोल खताळ आणि नगरपरिषद प्रशासनाचे आभार मानले आहेत. उर्वरित रकमेची कार्यवाही देखील लवकरच पूर्ण केली जाईल, असे मुख्याधिकारी कोकरे यांनी सांगितले.

दरम्यान या संदर्भात मुख्याधिकारी कोकरे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सदरची मदत पालिका फंडातून दिल्याची माहिती महाराष्ट्र संवाद न्यूजला दिली.

रियाज पिंजारीलाही मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळावी: आमदार खताळ यांची मागणी

दरम्यान, संगमनेर गटार दुर्घटनेत अतुल पवार यांना वाचवण्यासाठी गेलेले आणि दुर्दैवी निधन झालेले रियाज पिंजारी याच्या कुटुंबीयांनाही शासनाकडून मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळावी, अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी आज शुक्रवारी विधानसभेत केली आहे. त्यांनी या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,055
अतुल पवार अमोल खताळ आर्थिक मदत धनादेश रामदास कोकरे रियाज पिंजारी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

By Annant Ppangarkar30/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर : खरीप हंगामातील पिकांची वाढती गरज आणि पिण्याच्या…

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.