Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रामराज्य शस्त्राने नव्हे, तर संस्कार आणि सदाचाराने येते: रामायणाचार्य ढोक महाराज

June 16, 2026

आज मंगळवार, १६ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 16, 2026

खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या दोन वर्षांच्या कारकिर्दीचा फुसका बार; वंचितच्या उत्कर्षा रूपवते यांचा थेट हल्लाबोल

June 15, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » रविवार विशेष लेख — शान गेली, मानही शरमिंदी झाली!
विश्लेषण

रविवार विशेष लेख — शान गेली, मानही शरमिंदी झाली!

विधानभवनातील सुरक्षा रक्षक या सगळ्या प्रसंगांवर खाजगी बोलतात तेव्हा दुर्देवं वाटतं. कर्मचारी तर कंटाळले होते. इतकं हतबल विधानभवन कधीच पाहिलं नव्हतं, अशी त्यांची पहिली प्रतिक्रिया असते.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJuly 20, 2025No Comments5 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

राज्य विधानमंडळ इतकं खाली गेलंय, हे ऐकून मन विचलित होतं. 1978 पासून या सभागृहांशी संबंधित असलेले माजी आमदार उल्हास पवार यांनी व्यक्त केलेली ही प्रतिक्रिया ऐकली की वाईट वाटतं. इतकासा आवाज चढला तरी पीठासनावरील अधिकार्‍याची भीती वाटायची. मारामारी हा तर विषयच नसायचा. अगदीच नाराजी व्यक्त करण्यासाठी विरोधकांकडून आयुधांचा वापर व्हायचा. पण त्यासाठी हातघाईवर यायची आवश्यकता पडत नसे. एकेका सदस्याचा मान इतका तोडीचा असायचा की पीठासनावरील अधिकारीच त्याची काळजी घेत. महाराष्ट्राचं हीत हेच या सगळ्यांचं ध्येय असायचं. सभागृहातल्या उच्चकोटीच्या चर्चा ही तर दोन्ही सभागृहातील पर्वणीच. असे असंख्य प्रकरणं सांगता येतील, ज्यात उशिरापर्यंत सदस्य सभागृहात थांबायचे. चिंता महाराष्ट्राची असायची. आता ते राहिलं नाही. आपलं दायित्व हे लोकांप्रती असल्याचं ते चित्र होतं. कोणी मंत्र्याच्या अंगावर जाईल, कोणी मंत्री योग्यता सोडून बोलेल असं या सभागृहात झालं नाही. सभागृहातील बुजूर्गांच्या कामकाजाची पध्दती हाताळून श्रीकांत जिचकरांसारखे अनेक तरूण आमदार सभागृहात उभे राहिले. उल्हास पवारांची ही प्रतिक्रिया ऐकल्यावर आज आपण कुठे आहोत, याची जाणीव झाली. पडळकरांसारखी माणसं तिथे कोणी पाठवत नसत. अगदीच अरूण गवळीसारखा कोणी निवडून आलाच तर भोवतालच्या सभ्य माणसांमुळे त्यालाच संकोच वाटायचा. आज काळ बदलला आणि ज्यांना अक्कल नाही अशांना चलती आली. पडळकरांसारख्याना चांगले दिवस आले. राज्य विधिमंडळाचं इतकं अवमुल्यन कधीच झालं नव्हतं.

राज्य विधिमंडळाच्या शुक्रवारी संपलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसर्‍या गुरुवारी भवनाच्या आवारात जे काही घडलं त्याने महाराष्ट्राची मानच शरमिंदी झाली, असं नाही तर संतांच्या पावन भूमीची इभ्रतच रस्त्यावर आली. असंगाशी संग केल्यावर प्राणाशी गाठ होणारच. तेच गुरुवारच्या सायंकाळी विधानभवनाच्या आवारात घडलं. विधिमंडळाच्या आमच्या सुमारे पंधरा वर्षांच्या वार्तांकनाच्या काळातला गुरुवार हा काळा दिवस. शिवसेना-भाजप युतीच्या 2019 च्या सत्तेवेळी एका सचिन सुर्यवंशी नामक पोलीस उपनिरीक्षकाने क्षितीज ठाकूर यांची गाडी बांद्रा सीलिंकवर आडवल्याच्या इतक्याशा कारणासाठी विधानभवनात घडलेल्या राड्यानंतर असा प्रकार प्रथमच. हाणामारी करणार्‍या क्षितीज आणि बोलबच्चन राम कदम यांची सर्वत्र निर्भत्सना झाली. अध्यक्ष असलेल्या वळसे पाटलांनी त्यांना सभागृहापासून दूर केलं. मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांनी मराठीचा अवमान केल्याच्या कारणास्तव अबू आझमी यांना केलेली मारहाण या काही अपवादात्मक घडलेल्या घटना. राज्याच्या विधानसभेने डॉन अरूण गवळीची शेळी झालेली पाहिलेली आहे. गल्लीतले भले भले दादा या सभागृहात नरम झालेले महाराष्ट्राने पाहिले आहेत. तेव्हा अध्यक्ष पदावरील व्यक्तींचा दबदबा होता. सत्ताधार्‍यांचे नसते लाड ते पुरवत नसत. हे कायद्यासाठी कायद्याने चालणारं सभागृह असल्याने कायदा मोडणार्‍यांची त्या अध्यक्षांनी कधी गय केली नाही. आज हे राहिलेलं नाही. सत्ताधारी आमदाराला एक आणि विरोधकांना दुसरा न्याय दिला जाऊ लागल्याचे परिणाम सभागृहात दिसू लागले. वाह्यात बोलणार्‍यांना चांगले दिवस आले. तिथे पडळकरांसारख्या मवाल्यांचं फावलं. असे अनेक आमदार विद्यमान सभागृहात आहेत. आणि ते सारे भाजपचं कमळ घेऊन सभागृह चालवतात. असल्या वकूब नसलेल्या माणसांना लोकं निवडणून देतात म्हणून त्यांना कायदे मंडळाचं महत्व कळत नाही. गुरुवारच्या घटनेला गोपीचंदला निवडून देणारेच सर्वाधिक दोषी आहेतच. पण त्याहून सर्वाधिक दोषी हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. असली विक्षिप्त माणसं हेरून भाजपने त्यांना मंदिरात आणून बसवलं. चांगल्या संगतीचा परिणाम होऊन त्यांच्यात सुधारणा होईल, असं वाटत होतं. पण त्याऐवजी मंदिरच अपवित्र बनत चाललं. गटारात बसणार्‍या डुक्कराला कितीही स्वच्छ केलं तरी तो गटार सोडत नसतो. असली अनेक डुकरं विधानमंडळात पाठवून भाजपने या मंदिराला कलंकित केलंय. सारं काही हातून गेल्यावर हतबलता व्यक्त करून काही उपयोग नाही. हा कामचलावूपणा झाला.  

भाजपने अशा अनेकांना पोसलं आहे. ज्यांची औकात नाही त्यांना निवडून आणायचं आणि आपल्याला नको असलेल्या विरोधकावर आणि सत्तेतल्याच स्पर्धकांवर सोडायचं नीच राजकारण महाराष्ट्रात यथासांग सुरू आहे. कोणी नितेश उध्दव ठाकरेंवर बोलतो तर कोणी नाना पटोलेंवर. सदा खोत आणि पडळकरवर शरद पवारांची जबाबदारी दिलीय. घालून पाडून टीका करताना हे पवारांच्या व्यंगावर येतात, तरी भाजपने या मवाल्यांना कधीच रोखलं नाही. विरोधकांवर जीभ चालवण्यासाठी भाजपने पडळकर, खोत, नितेश राणे, चित्रा वाघ, भातखळकर, प्रसाद लाड या माणसांना अक्षरश: पोसलं आहे. त्यांनी काहीही वक्तव्यं केली तरी त्यांना रोखलं जात नाही. कैवार घेतल्यागत त्यांना खुलेआम बोलू दिलं जातं. वाह्यात बडबड ही या मंडळींची विकृती आहेच. हीच विकृती हेरून त्यांना जेव्हा विधानमंडळात पाठवलं जातं तेव्हा भाजपचं रूप कळतं. ज्या ऋषिकेश टकले याला हाताशी धरून पडळकरने विधानभवनाच्या लॉबीत ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला त्या टकलेवर हातभट्टी दारूवाले, झोपडपट्टी दादा अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहेत. असल्या नामचीन व्यक्तीला विधानभवनात प्रवेश देताना पडळकरने सुरक्षा व्यवस्थेला झिडकारून लावलं होतं. अति झाल्यावर मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष गळे काढू लागले आहेत. आमदार म्हणून आपण काय लायकीची माणसं निवडलीत हे मुख्यमंत्र्यांना उमगलं तरी महाराष्ट्राचं नशिब. आपण कोणाला निवडून देतो, असा राज ठाकरेंनी केलेला सवाल म्हणूनच जिव्हारी लागतो.

महाराष्ट्राच्या विधानभवनाची रया या सत्तेने पार घालवली आहे. अनेक मान्यवरांनी या मंदिराचं पावित्र्य केवळ जपलंच नाही त्यांनी ही पावित्र्यता अधिक खोलवर नेली. एखाद्या विषयावर बोलणार्‍या आमदाराचं भाषण ऐकण्यासाठी सभागृहातल्या गॅलर्‍या भरायच्या. कायदा बनवण्याच्या विषयावर तर सात सात तास बोलणारे नेते विधानभवनाने पाहिले आहेत. हा काळ इतक्या झपाट्याने बदलतो यावर विश्‍वास नाही बसत. केशवराव धोंडगे, दि. बा. पाटील, दत्ता पाटील, एन. डी. पाटील, नितीन गडकरी अशी कितीतरी नावं घ्यावीत ज्यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांची उंची वाढवली. सत्तेला त्यांनी सळो की पळो करून सोडलं. ही उंची कायम राखण्याची जबाबदारी ज्यांची होती ती त्यांनी पार पाडली नाहीच. उलट पडळकर, खोतांसारख्यांनी तर त्यात विष ओतलं.

देशात सर्वात शुचिर्भूत मानल्या गेलेल्या महाराष्ट्राच्या विधानमंडळाने दिलेले सभापती आणि अध्यक्षही त्याच तोडीचे होते. अध्यक्षांच्या दालनात जाणं हा तर प्रचंड आदबीचा विषय ठरे. सहज कोणी अध्यक्षांच्या दालनात जात नसे. इतकी उंची त्या पदाला होती. आज परिस्थिती इतकी बदललीय की भवनात ये-जा करणार्‍यांमध्ये तोडपाणी आणि दलालांचा भरणा उठून दिसेल. विधानसभा निवडणुकीपूर्वी तर विधानभवनाची दारं बधवार पार्कच्या नागरिकांसाठी रात्री दहा वाजेपर्यंत खुली असायची. यामुळे पडळकर सारख्यांचं फावलं होतं. विधानभवनातील सुरक्षा रक्षक या सगळ्या प्रसंगांवर खाजगी बोलतात तेव्हा दुर्देवं वाटतं. कर्मचारी तर कंटाळले होते. इतकं हतबल विधानभवन कधीच पाहिलं नव्हतं, अशी त्यांची पहिली प्रतिक्रिया असते. राज्य ते चालवतात पण पडळकर, राणे, खोतांसारख्यांवर त्यांचा काहीही अंकुश नाही. ही माणसं इतकी वाह्यात बडबडतात की त्यामुळे जातीय आणि धार्मिक दंगली घडतील की काय, अशी परिस्थिती निर्माण होते. या निमित्त अध्यक्षांनी काही बंधनं मंत्री आणि आमदारांवर घालण्याचा प्रयत्न केला आहे. हौदसे गयी वह बूंद नही आती, हे अध्यक्षांना कळायला हवं होतं. बंधनं घालण्याबरोबरच गावगुंडांची सोबत करणार्‍या पडळकर याला निलंबित केलं असतं तर सगळ्याच सदस्यांना अद्दल घडली असती.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 736
प्रवीण पुरो रविवार विशेष
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

रविवार विशेष लेख: मोदी नेहरूंशी बरोबरी करू शकतात?

June 14, 2026

रविवार विशेष लेख: सावधान, दिवस कठीण आहेत!

June 7, 2026

रविवार विशेष लेख — प्रिय तुकाराम मुंढेजी, ह्या दलालांना आवरा…

May 31, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

रामराज्य शस्त्राने नव्हे, तर संस्कार आणि सदाचाराने येते: रामायणाचार्य ढोक महाराज

By अनंत पांगारकरJune 16, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: रामराज्य हे केवळ शस्त्राच्या बळावर उभे राहत नसून, त्यासाठी शास्त्र,…

आज मंगळवार, १६ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 16, 2026

खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या दोन वर्षांच्या कारकिर्दीचा फुसका बार; वंचितच्या उत्कर्षा रूपवते यांचा थेट हल्लाबोल

June 15, 2026

सत्ताधारी अन् विरोधक आमनेसामने येणार! २२ जूनपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन

June 15, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.