

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त
संगमनेर, प्रतिनिधी:
संगमनेरमध्ये सातत्याने वैद्यकीय व्यवसायाला गालबोट लावणाऱ्या घटना समोर येत आहेत. कोणी विनयभंगाच्या, तर कोणी बेकायदेशीर गर्भपात प्रकरणी चर्चेत असतानाच पुन्हा एकदा डॉक्टरांकडून विनयभंगाचा प्रकार समोर आल्याने वैद्यकीय क्षेत्रातील नैतिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
डॉ. राहुल विश्वनाथ इंगळे (रा. सुकेवाडी, ता. संगमनेर) यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (22 जुलै) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास कुरण येथील डॉ. इंगळे यांच्या क्लिनिकमध्ये घडली.
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, पीडित महिला मागील दोन दिवसांपासून टॉन्सिल्सच्या त्रासाने त्रस्त होती. उपचारासाठी ती आपल्या मुलासोबत डॉ. राहुल इंगळे यांच्या क्लिनिकमध्ये गेली होती. त्यावेळी महिलेचा मुलगा क्लिनिकच्या बाहेर थांबला होता, तर पीडित महिला एकटीच डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेली.
डॉ. इंगळे यांनी तिला दवाखान्यातील बेडवर झोपण्यास सांगितले. तपासणीसाठी आले असता त्यांच्या तोंडाला दारू प्यायल्यासारखा वास येत होता. टॉन्सिल तपासत असताना त्यांनी पीडित महिलेच्या गळ्याला एक हात लावला आणि दुसऱ्या हाताने लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 74, 75, 79 नुसार गुन्हा (गुरनं. 667/2025) दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पटेल करत आहेत.




पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, 
याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात