Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शुक्रवार, १८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे सर्व राशीचे राशी भविष्य

18/09/2026

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आश्रमशाळेत विद्यार्थिनींशी असभ्य वर्तन: शिक्षक, मुख्याध्यापिकेसह चौघांवर गुन्हा दाखल
गुन्हेगारी

आश्रमशाळेत विद्यार्थिनींशी असभ्य वर्तन: शिक्षक, मुख्याध्यापिकेसह चौघांवर गुन्हा दाखल

चौघांविरोधात अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त

अकोले: 

अकोले तालुक्यातील तिरडे येथील एका आश्रमशाळेत विद्यार्थिनींशी असभ्य वर्तन झाल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधित शिक्षक, त्याला मदत करणाऱ्या शिक्षिका, मुख्याध्यापिका आणि एका शिपायाविरोधात अकोले पोलीस ठाण्यात पोस्को (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. ती आश्रमशाळेच्या वसतिगृहात राहत असताना, हा प्रकार घडला. जेव्हा ती आठवीत होती, तेव्हापासूनच धुपेकर नावाचा शिक्षक (पूर्ण नाव उपलब्ध नाही) तासिका संपल्यानंतर वर्गात येऊन तिच्या आणि तिच्या मैत्रिणींसोबत बोलण्याचा प्रयत्न करत असे. एका जेवणाच्या सुट्टीत धुपेकर वर्गात आले आणि पीडित विद्यार्थिनी मैत्रिणींसोबत बाकावर बसलेली असताना, त्यांनी तिला “काय करत आहेस?” असे विचारले. यानंतर पीडितेने बोलणे टाळण्यासाठी दुसऱ्या बाकावर जाऊन उभी राहिली असता, धुपेकर यांनी तिच्याशी गैरकृत्य केले. इतकेच नाही, तर त्यांनी तिच्या १७ वर्षीय मैत्रिणीसोबतही गैरकृत्य केले आणि इतर मुलींना “माझे पाठ खाजवून दे आणि हातपाय दाबून दे” असे म्हटले.

या धक्कादायक प्रकारानंतर पीडित विद्यार्थिनी आणि तिच्या मैत्रिणींनी मुख्याध्यापिका कुलथे यांच्याकडे जाऊन सर्व प्रकार सांगितला. मात्र, मुख्याध्यापिकांनी त्यांना “तुम्हाला माझी शपथ आहे, घरी हा प्रकार सांगू नका” असे सांगून गप्प केले. या घटनेनंतर धुपेकर यांची दुसऱ्या शाळेत बदली झाली.

त्याचबरोबर, शाळेतील सफाई कामगार धांडे मामा (पूर्ण नाव उपलब्ध नाही) यांनीही नववीमध्ये असताना पीडित विद्यार्थिनीचा शाळेच्या आवारात आणि वसतिगृहात पाठलाग करण्यास सुरुवात केली. ती कपडे धूत असतानाही ते जवळ उभे राहत असत. असे प्रकार वारंवार घडू लागल्याने, पीडितेने पुन्हा एकदा मुख्याध्यापिका कुलथे यांना सर्व सांगितले. त्यावेळी कुलथे यांनी तिला “जर झालेला प्रकार कोणाला सांगितला, तर तुम्हाला शाळेतून काढून टाकू” अशी धमकी दिली.

घरी सांगितल्यास घरचे रागावतील या भीतीपोटी पीडितेने सुरुवातीला कोणतीही घटना घरी सांगितली नाही. मे महिन्याच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत धांडे मामा यांचीही बदली झाली. दहावीत गेल्यानंतर मुख्याध्यापिका कुलथे पीडितेला सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून बोलू लागल्या आणि तिला मानसिक त्रास देऊ लागल्या.

हा मानसिक त्रास असह्य झाल्याने, पीडित विद्यार्थिनीने आश्रमशाळेतील मोबाईल फोनवरून आपल्या आईला फोन केला आणि गेल्या दोन वर्षांपासून घडलेला सर्व प्रकार सविस्तर सांगितला. त्यानंतर पीडितेचे पालक आणि पीडित मुलगी यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी दिलेल्या जबाबावरून धुपेकर (शिक्षक), गभाले यांची पत्नी (शिक्षिका), मुख्याध्यापिका कुलथे आणि धांडे मामा (शिपाई) या चौघांविरोधात अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,438
गुन्हेगारी विनयभंग
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

शुक्रवार, १८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे सर्व राशीचे राशी भविष्य

By Annant Ppangarkar18/09/20260

आजचे राशिभविष्य ​मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता…

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.