Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

17/09/2026

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

गुरुवार, १७ सप्टेंबर — जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सुनेचं क्रूर कृत्य: सासऱ्याच्या कामाच्या त्रासातून जेवणात मिसळलं विष; पतीलाही विषबाधा!
गुन्हेगारी

सुनेचं क्रूर कृत्य: सासऱ्याच्या कामाच्या त्रासातून जेवणात मिसळलं विष; पतीलाही विषबाधा!

पोलीस ठाण्यात शुक्रवारी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त

रत्नागिरी: 

संगमेश्वर तालुक्यातील देवरूख येथील कोसुंब रेवाळेवाडी येथे सासऱ्याने घरातील कामे सांगितल्याच्या रागातून सुनेने जेवणात विषारी द्रव्य मिसळून त्यांना जीवे मारण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत पतीलाही विषबाधा झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. देवरूख पोलिसांनी संबंधित सुनेला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सचिन जगन्नाथ सोलकर (वय ३४) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. अटक करण्यात आलेल्या सुनेचे नाव स्वप्नाली सचिन सोलकर (वय ३२) असे आहे. सचिन आणि स्वप्नाली यांचा विवाह याच वर्षी १३ एप्रिल २०२५ रोजी झाला होता. स्वप्नालीला सासरे जगन्नाथ सोलकर हे घरातील कचरा काढणे, साफसफाई करणे आणि इतर कामे व्यवस्थित करण्यास सांगत असत. याच गोष्टीचा स्वप्नालीला राग आला.

या रागाच्या भरात तिने जगन्नाथ सोलकर यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या जेवणात विषारी द्रव्य मिसळले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. हेच जेवण पती सचिन सोलकर यांनीही खाल्ल्याने त्यांनाही विषबाधा झाली. ही घटना २२ जुलै रोजी रात्री ९.३० वाजता घडली.

विषबाधेमुळे जगन्नाथ सोलकर आणि सचिन सोलकर यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यांना तात्काळ देवरूख ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारादरम्यान, दोघांनाही विषबाधा झाल्याचे स्पष्ट झाले. सुदैवाने, आता दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सचिन सोलकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, स्वप्नाली सोलकर हिच्यावर देवरूख पोलीस ठाण्यात शुक्रवारी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास देवरूख पोलीस करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,340
क्रूरता गुन्हेगारी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

By Annant Ppangarkar17/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील राजापूरच्या जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या निवड…

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

गुरुवार, १७ सप्टेंबर — जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

17/09/2026

संगमनेरमध्ये युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांसाठी विशेष आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण शिबिर; आपत्कालीन प्रसंगात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा: डॉ. जयश्रीताई थोरात

16/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.