

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त
पुणे:
पुणे शहरानजीकच्या खराडी भागात सुरू असलेल्या एका हाय-प्रोफाइल रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकत तिचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे. डॉ. खेवलकर हे राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती असल्याने या अटकेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
‘हाऊस पार्टी’च्या नावाखाली सुरू असलेल्या या पार्टीवर गुन्हे शाखेने मध्यरात्री छापा टाकला. पोलिसांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ, दारू आणि हुक्का जप्त केला आहे. या प्रकरणी दोन महिला आणि पाच पुरुष अशा एकूण सात जणांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खराडीमधील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये रेव्ह पार्टी सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाई करत हा छापा टाकला. ताब्यात घेतलेल्या सर्व आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, या पार्टीत त्यांची नेमकी काय भूमिका होती, याचा तपास पोलीस करत आहेत. डॉ. प्रांजल खेवलकर यांनी अमली पदार्थांचे सेवन केले होते की नाही, याबाबत अजून अधिक माहिती समोर आलेली नाही.
या घटनेमुळे राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांच्या पुढील तपासातून या प्रकरणातील अधिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे.




‘हाऊस पार्टी’च्या नावाखाली सुरू असलेल्या या
या घटनेमुळे राजकीय क्षेत्रात जोरदार