Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राज्य मंत्रिमंडळाचे 8 मोठे निर्णय: पंचायतराज पुरस्कारांपासून ते न्यायालयांच्या स्थापनेपर्यंत
बैठक

राज्य मंत्रिमंडळाचे 8 मोठे निर्णय: पंचायतराज पुरस्कारांपासून ते न्यायालयांच्या स्थापनेपर्यंत

या निर्णयांमध्ये ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ सुरू करणे, १० जिल्ह्यांमध्ये ‘उमेद मॉल’ उभारणे, ‘ई-नाम’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे निकाली काढण्यासाठी विशेष न्यायालयांची स्थापना करणे, अशा विविध घोषणांचा समावेश आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त

मुंबई, विशेष प्रतिनिधी: 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (आज) पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काही प्रमुख नेते उपस्थित होते.

या निर्णयांमध्ये ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ सुरू करणे, १० जिल्ह्यांमध्ये ‘उमेद मॉल’ उभारणे, ‘ई-नाम’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे निकाली काढण्यासाठी विशेष न्यायालयांची स्थापना करणे, अशा विविध घोषणांचा समावेश आहे.

मंत्रिमंडळाने घेतलेले प्रमुख निर्णय खालीलप्रमाणे:

 * ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’: राज्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी हे अभियान राबवले जाईल. एकूण १,९०२ पुरस्कार दिले जातील. (ग्राम विकास विभाग)

* ‘उमेद मॉल’ (जिल्हा विक्री केंद्र): ‘उमेद’ – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत १० जिल्ह्यांमध्ये ‘उमेद मॉल’ उभारण्यात येणार आहेत. यामुळे राज्यातील ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होईल. (ग्राम विकास विभाग)

 * ‘ई-नाम’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी: राष्ट्रीय नामांकित बाजारतळ स्थापन करण्याच्या दृष्टीने, कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे नियमन करण्यासाठी महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली. (सहकार व पणन विभाग)

 * विशेष न्यायालयांची स्थापना: महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्यासाठी गोंदिया, रत्नागिरी आणि वाशिम येथे विशेष न्यायालये स्थापन केली जातील. (विधि व न्याय विभाग)

 * पिंपरी-चिंचवड येथे नवीन न्यायालये: पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) अशा दोन न्यायालयांची स्थापना करण्यास आणि त्यासाठी आवश्यक पदांना मंजुरी देण्यात आली. (विधि व न्याय विभाग)

 * बोर मोठा प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी निधी: वर्धा जिल्ह्यातील बोर मोठा प्रकल्प (ता. सेलू) अंतर्गत धरण व वितरण व्यवस्था नूतनीकरणाच्या कामासाठी २३१.६९ कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता मिळाली. (जलसंपदा विभाग)

 * धाम मध्यम प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी निधी: वर्धा जिल्ह्यातील धाम मध्यम प्रकल्प (ता. आर्वी) अंतर्गत धरण व वितरण व्यवस्था नूतनीकरणाच्या कामासाठी १९७.२७ कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली. (जलसंपदा विभाग)

 * ॲडव्होकेट अकॅडमीसाठी जमीन: महाराष्ट्र व गोवा वकील परिषद, मुंबई यांना ॲडव्होकेट अकॅडमी स्थापन करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील मौजे कळवा येथे जमीन देण्यास मान्यता देण्यात आली. (महसूल विभाग)

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 789
देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळ बैठक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश; संगमनेर तालुक्यातील प्रलंबित पाणीपुरवठा योजना नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा: मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश… उपअभियंता सक्तीच्या रजेवर, तर योजनांचे होणार थर्ड पार्टी ऑडिट

07/10/2026

संगमनेरमध्ये पालकमंत्री विखे पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा: दुष्काळात कामात हलगर्जीपणा चालणार नाही; पशुसंवर्धन विभागाला नोटीस

05/10/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

By Annant Ppangarkar10/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- भौगोलिकदृष्ट्या विस्ताराने मोठ्या असलेल्या संगमनेर तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांचे जाळे अधिक भक्कम…

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.