Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक न झाल्याने महायुतीचे पदाधिकारी संतप्त; ‘जिरवा-जिरवी’ बंद करण्याचा विखे पाटलांचा सज्जड दम
बैठक

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक न झाल्याने महायुतीचे पदाधिकारी संतप्त; ‘जिरवा-जिरवी’ बंद करण्याचा विखे पाटलांचा सज्जड दम

या प्रकारामुळे संगमनेर महायुतीमधील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/05/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:

जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक होणार असल्याचे खोटे निरोप देऊन केवळ गर्दी जमवण्यासाठी प्रशासकीय बैठकीला बोलावल्याचा आरोप करत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

महायुतीमधील अंतर्गत बेबनाव पालकमंत्र्यांसमोर उघड होऊ नये, यासाठी आमदारांच्या संपर्क कार्यालयातून ही खेळी खेळली गेल्याची भावना या पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाली असून, या प्रकारामुळे संगमनेर महायुतीमधील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

रविवारी सुटीच्या दिवशी संगमनेर तालुक्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत मालपाणी लॉन्स येथे अधिकारी, पदाधिकारी आणि ग्रामस्थांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या आढावा बैठकीनंतर महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक होणार असून, त्यासाठी उपस्थित राहावे, असे फोन शनिवारी आमदाराच्या संपर्क कार्यालयातून महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना करण्यात आले होते. या निरोपामुळे महायुतीचे अनेक पदाधिकारी मोठ्या अपेक्षेने बैठकीला हजर झाले.

मात्र, आढावा बैठक संपताच पालकमंत्री विखे पाटील हे तातडीने पुढील दौऱ्यासाठी निघून गेले. प्रत्यक्षात पालकमंत्र्यांना अशा कोणत्याही संघटनात्मक बैठकीची पूर्वकल्पनाच देण्यात आली नव्हती, अशी माहिती समोर आल्यानंतर पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली. केवळ आढावा बैठकीत गर्दी दाखवण्यासाठी आणि महायुतीची एकजूट असल्याचा आव आणण्यासाठी आपल्याला फसवून बोलावण्यात आले, असा सूर पदाधिकाऱ्यांमध्ये उमटला.

याविषयी काही पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी उघडपणे बोलणे टाळले असले तरी अंतर्गत वर्तुळात मात्र यावरून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. दुसरीकडे, रविवारी सुटीच्या दिवशी ही बैठक लावण्यात आल्याने शासकीय अधिकाऱ्यांमधूनही सुप्त नाराजी व्यक्त केली जात होती.

दरम्यान, या टंचाई आढावा बैठकीत बोलताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्थानिक राजकारणावर आणि नेत्यांच्या कार्यपद्धतीवर अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढले. निवडणूक संपली असून आता विकासकामांवर लक्ष केंद्रित करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. माणसा-माणसांमध्ये वाद लावणे आणि ठराविक कार्यकर्त्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना टार्गेट करणे आता बंद झाले पाहिजे, असा इशारा देत पालकमंत्र्यांनी स्थानिक नेत्यांचे चांगलेच कान टोचले. पालकमंत्र्यांचा हा रोख नेमका कोणाकडे होता, यावर बैठकीनंतर उपस्थित पदाधिकाऱ्यांमध्ये ‘समझनेवाले को इशारा काफी है’ अशीच चर्चा रंगली होती.

@ विखे पाटील…

विधानसभा निवडणूक आता संपली आहे. संगमनेर तालुक्यात यापूर्वी जे जिरवा-जिरवीचे राजकारण केले जात होते, त्याच मुद्द्यावरून संबंधितांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे आता तसले राजकारण कोणीही करू नये. माणसा-माणसांमध्ये वाद लावणे आणि ठराविक लोकांना टार्गेट करण्याचे कार्यक्रम तातडीने बंद करा. जिरवा-जिरवी बाजूला ठेवून केवळ विकासकामांवर लक्ष द्या, असे टंचाई आढावा बैठकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,121
पाणीटंचाई आढावा बैठक बैठक महायुती बैठक राधाकृष्ण विखे पाटील
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश; संगमनेर तालुक्यातील प्रलंबित पाणीपुरवठा योजना नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा: मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश… उपअभियंता सक्तीच्या रजेवर, तर योजनांचे होणार थर्ड पार्टी ऑडिट

07/10/2026

संगमनेरमध्ये पालकमंत्री विखे पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा: दुष्काळात कामात हलगर्जीपणा चालणार नाही; पशुसंवर्धन विभागाला नोटीस

05/10/2026

सहकाराची परंपरा जपण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत, संगमनेरात पार पडली बैठक; या नेत्यांची होती उपस्थिती

27/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- यावर्षीचा दुष्काळ हा कोरोना संकटाप्रमाणे असून कठीण दुष्काळी संकटातून मार्ग काढत…

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.